Chanakya Niti: चाणक्य म्हणतात प्रत्येक विवाहीत महिलेला आपल्या पतीकडून या 3 गोष्टी हव्या असतात
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे, जे विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे, जे विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाचा आर्थिक व्यवहार कसा असावा? कुठे बतच करावी? कुठे सढळ हातानं दान करावं याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे. मानसाचं वैवाहिक आयुष्य कसं असावं? वैवाहिक आयुष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्या सोडवण्याचा मार्ग काय आहे? यावर देखील आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे. काही उपाय सांगितले आहेत. चाणक्य यांनी सांगितलेले हे उपाय आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात.
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सुखी संसाराचं सूत्र सांगितलं आहे, आर्य चाणक्य म्हणतात संसारात अशी अनेक कारण असतता, ज्यामुळे पती-पत्नीचे वाद होतात. कधीकधी हे वाद टोकाला पोहोचतात. हे सर्व टाळण्यासाठी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये काही उपाय सांगितले आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहेत.
प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात की एकदा तुमचं लग्न झालं की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे, तुम्ही आयुष्यात तुमच्या जोडीदाराला जी-जी वचन दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आयुष्यातीस अर्ध्या समस्या तिथेच संपतात.
प्रेम – आर्य चाणक्य म्हणतात या जगातील कोणतंही नातं हे प्रेमावर टीकलेलं असतं, तुमच्या जोडीदारांची तुमच्याकडून फार काही अपेक्षा असते असं नाही. मात्र त्याची एक अपेक्षा आवश्य असते, की आपल्याही जोडीदाराचं आपल्यावर प्रेम असावं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करा, नुसतं प्रेमच करू नका, तर ते तुम्हाला दाखवता देखील आलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या संसारामध्ये गोडवा निर्माण होण्यास मदत होते.
आदर – आर्य चाणक्य म्हणतात आदर ही अशी एक गोष्ट आहे, की तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेवढा द्याल, तेवढाच तो तुम्हाला देईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करायला शिका. छोट्या -छोट्या गोष्टींमध्ये इगो आणू नका. या तीन गोष्टी तुम्ही जर कटाक्षाणं पाळल्या तर तुमचा संसार सुखाचा होईल, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
