Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या तीन सवयींमुळे व्यक्ती बनतो श्रीमंत
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला श्रीमंतीकडे घेऊन जातात, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आयुष्य जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? आणि काय करावं? याबद्दल माहिती दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आदर्श जीवनाचा वस्तुपाठ सांगितला आहे.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श राजा कसा असावा? त्याचा प्रजेसोबत व्यवहार कसा असावा? कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात, मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? घरातील कर्ता पुरुष कसा असावा? मुलांवर कशा पद्धतीनं संस्कार करावेत अशा ऐकना अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहे, चाणक्य म्हणतात या सवयी जर तुमच्या अंगी असतील तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. त्या सवयी कोणत्या आहेत? आणि आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.
आर्य चाणक्य म्हणतात दान ही एक फार मोठी गोष्ट आहे, जो व्यक्ती आपल्या कमावलेल्या पैशांमधून काही पैशांचं दान करतो, गरजू व्यक्तींना मदत करतो, त्यांच्या संकट काळात धावून जातो, त्याच्यावर सदैव इश्वराचा आशीर्वाद असतो, त्याला पैशांची कधीच कमी भासत नाही.
आर्य चाणक्य पुढे म्हणतात की बचत ही देखील अशी सवय आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं जगू शकता, तुम्ही जी पैशांची बचत करता, तो पैसा तुम्हाला संकट काळात कामाला येतो. सतत कर्म करत राहणं – आर्य चाणक्य म्हणतात कष्टाशिवाय जगात पर्याय नाही, त्यामुळे कधीही कामात आळस करू नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
