Chanakya Niti : चाणक्य म्हणतात अशा व्यक्तींना यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही
चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे माणूस यशस्वी होतो असं चाणक्य म्हणतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, जर या सवयी माणसानं अंगिकारल्या तर तो आयुष्यात यशस्वी होतोच असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात काय आहेत त्या सवयी आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं ते?
कमजोरी कोणालाच सांगू नका – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसामध्ये काही न काही कमजोरी असतेच, जशी कमजोरी असते तसेच काही प्रभावी गुण देखील असतात. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने आपली कमजोरी इतर कोणालाही सांगू नये, यामुळे लोकं तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या कमजोरीचा विचार करत बसू नका, त्याऐवजी तुमच्या कडे जे प्रभावी गुण आहेत, त्याचा उपयोग करा आयुष्यात तुम्हाला नक्की यश मिळेल.
खर्च विचारपूर्वक करा – चाणक्य म्हणतात व्यक्ती फार खर्चिक असता कामा नये. तुम्ही जर तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च कराल तर तुम्ही संकटात सापडण्याची शक्यता असते, पैशांच्या जोरावर तुम्ही जगातील कोणत्याही संकटांचा सामना करू शकतात. त्यामुळे व्यक्तीला बचतीची सवय असावी,
मुर्ख व्यक्तींशी वाद घालू नका – चाणक्य म्हणतात मुर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नका, त्यामध्ये तुमचंच नुकसान आहे, मुर्ख व्यक्तींना कधीही सल्ला देऊ नका.
अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा – चाणक्य म्हणतात आयुष्यात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा, त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
कर्तव्य आणि धर्मनिष्ठ राहा – चाणक्य म्हणतात तुमचं जे कर्तव्य आहे, काम आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा, कारण त्यामुळेच या जगात तुमचं नाव होणार आहे. मात्र कर्तव्य करताना कधीही धर्माला सोडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
