AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी कराच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत हेते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात काही लोकांचा स्वभाव हा साधा असतो, असे व्यक्ती सरळमार्गी असतात, मात्र नेमका त्यांच्या याच स्वभावाचा लोक फायदा घेतात. लोकांनी आपली फसवणूक करू नये, यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं.

Chanakya Niti : लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी कराच
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 8:01 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीचे विविध स्वभाव सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. काही लोक हे खूप चतुर आणि स्वार्थी असतात. तर काही लोक हे स्वभावाने खूपच भोळे आणि साधे असतात. मात्र जे लोक स्वार्थी आणि चतुर असतात असे लोक ज्या लोकांचा स्वभाव साधा असतो, सरळीमार्गी असतो त्यांचा चुकीच्या मार्गाने फायदा घेतात. स्वार्थी लोक आपला स्वार्थ साधतात, मात्र यामध्ये ज्यांचा स्वभाव हा साधा आहे, त्यांचं मोठं नुकसान होतं, हे समाजाचं वास्तव आहे. त्यामुळे आपला कोणीही फायदा घेऊ नये, यासाठी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आपलं गुपीत कोणाला सांगू नका – चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही अशा गोष्टी कोणासमोर उघड केल्या तर या जगातील स्वार्थी लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात, भविष्यात त्यामुळे तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कधीही आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सागू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

अति प्रामाणिकपणा टाळा – चाणक्य म्हणतात प्रामाणिक असणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र अति प्रामाणिकपणा किंवा सरळपणा टाळला पाहिजे. यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिलं आहे, चाणक्य म्हणतात तुम्ही कधी जंगलामध्ये गेला आहे का? तुम्ही निरीक्षण केलं असेल जंगलामध्ये जी झाडं सरळ असतात तीच आधी कापली जातात, कारण त्यांची उपयुक्तता अधिक असते. मात्र जी झाडं वाकडी असतात त्यांना कोणीही कापत नाही. त्यामुळे जर तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा असेल तर अति सरळपणा टाळा.

विश्वास कोणावर ठेवायचा – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही व्यक्ती ओळखायला शिकलं पाहिजे. ज्या व्यक्तीची जेवढी पात्रता तेवढाच त्याच्यावर विश्वास ठेवा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, त्यामुळे एक दिवस तुम्ही अडचणीत याल.

कुटुंबातील कलह बाहेर जाऊ देऊ नका – चाणक्य यांनी पुढे म्हटलं आहे की, जर तुमच्या घरात कोणत्याही कारणांमुळे काही वाद असेल तर हे वाद बाहेरच्या व्यक्तीपर्यंत जाऊ देऊ नका, ते घरातच मिटवा. यामुळे तुमचं घर सुरक्षित राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत