Chanakya Niti : लग्नापूर्वी जोडीदाराला… चाणक्याचा तो सल्ला; अजूनही का होतेय चर्चा?
Chanakya Niti Couple : आचार्य चाणक्य यांनी योग्य जीवन जगण्यासाठी अनेक सल्ले दिले आहेत. चाणक्य नीतीनुसार जीवन जगण्यासाठी नियम आणि शिस्त गरजेची आहे. तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांनी एक मोठा सल्ला दिला आहे.

Chanakya Niti Marriage Tips : नात्यात थोडा जरी दुरावा आला तरी संपूर्ण आयुष्य अवघड होतं. त्यात लग्न हा तर अत्यंत नाजूक क्षण असतो. पती-पत्नीतील नाते अत्यंत नाजूक असते. या नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी काही खास गोष्टींचे लक्ष ठेवणे आवश्यक असते. आचार्य चाणक्याने लग्न आणि सुखी संसारासाठी काही उपाय सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी लग्नापूर्वीच काही गोष्टींची खास काळजी घेण्याची गरज आहे.
चाणक्यानुसार, जर वैवाहिक जीवनात थोडा पण मीठाचा खडा पडला तर सुखी जीवनाचा सर्वनाश होईल. त्यासाठी अगोदरच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सुखी संसारासाठी लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराला तीन प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या नात्यात कोणतीच गडबड होणार नाही. आचार्य चाणक्याच्या मते या महत्त्वपूर्ण प्रश्नाची अगोदरच साथीदाराकडून माहिती घ्या.
योग्य वय काय याची माहिती घ्या




आचार्य चाणक्यच्या नीती शास्त्र या ग्रंथानुसार, लग्नापूर्वी तुमच्या साथीदाराच्या वयाची माहिती अगोदर घ्या. पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर असेल तर अनेकदा स्वभाव आणि वागणुकीवरून खटके उडू शकतात. लग्न तुटू शकते. अशावेळी दोघांमध्ये अनके विषयावर मतभेद होऊ शकतात. त्यांच्यात समंजसपणा नसेल तर लग्नाची लवकरच अखेर होऊ शकते. त्यामुळे भांडणं वाढू शकतात. तेव्हा वयाचे अंतर अगोदरच समजून घ्या.
आरोग्याविषयी माहिती जरूर घ्या
आचार्य चाणक्यच्या नीती शास्त्र या ग्रंथानुसार, सर्वात अगोदर आपल्या जोडदाराच्या आरोग्याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या. त्याला एखादा असाध्य रोग तर नाही ना. त्याला मानसिक रोग आहे का? याची खात्री करून घ्या. अनेकदा लग्न जुळवताना मध्यस्थी अथवा नातेवाईक खोटी माहिती देण्याची शक्यता असते. तेव्हा अगोदर आरोग्याची माहिती जरूर घ्या.
लग्नापूर्वी एखादे नाते असेल तर माहिती घ्या
आचार्य चाणक्य यांच्या मते, लग्नापूर्वी जोडीदाराचे एखादे जुने नाते, कोणासोबत संबंध असतील तर त्याची माहिती अगोदर घ्या. त्याविषयी जोडीदाराला विश्वासात घेऊन विचारा. नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तीकडून माहिती काढून घ्या. कारण लग्नानंतर जुने संबंधांनी डोके वर काढले तर भविष्यातील वैवाहिक जीवनात वादळ आल्याशिवाय राहत नाही.
( डिस्क्लेमर : ही बातमी माहितीच्या आधारावर आहे. यातील कोणत्याही गोष्टीला टीव्ही9 मराठी दुजोरा देत नाही. )