महाकुंभापूर्वी केसांना दिला जटांचा आकार, आता ही वाघीण रडकुंडीला आली, एका व्हिडिओतून सांगितली अशी आपबित्ती
Harsha Richhariya : महाकुंभ 2025 मध्ये साध्वी हर्षा रिछारिया हिच्या सौंदर्याची कोण तारीफ झाली. कोण कौतुक झाले. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सगळ्यांचेच लक्ष वेधले. पण कुंभ मेळ्यानंतर तिचे दुःख समोर आले. तिने ते समाज माध्यमावर शेअर केले.

26 फेब्रुवारी रोजी महाकुंभ 2025 संपणार आहे. यावेळी महाकुंभ विविध कारणांनी गाजला. प्रत्येक दिवस काही ना काही वेगळी बातमी, वृत्त घेऊन उगवत होता. या महाकुंभात अनेक बॉलिवूड स्टार, अनेक कलाकार, बड्या हस्तींनी रीतसर हजेरी लावली. सोशल मीडियावरील बहुचर्चित चेहरे पण या वेळी दिसले. महाकुंभ 2025 मध्ये साध्वी हर्षा रिछारिया हिच्या सौंदर्याची कोण तारीफ झाली. कोण कौतुक झाले. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सगळ्यांचेच लक्ष वेधले. पण कुंभ मेळ्यानंतर तिचे दुःख समोर आले. तिने ते समाज माध्यमावर शेअर केले.
सौंदर्याचे झाले कौतुक




महाकुंभाच्या सुरुवातीला हर्षा रिछारिया हिला सुंदर साध्वी, महामंडलेश्वर म्हणून खूप लोकप्रियता मिळाली. तिच्यामागे मीडिया हात धुवून लागला. ती कोण उच्च साधुत्वाला पोहचलेली साध्वी, योगिनी असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडवली. तिच्या कवड्यासारख्या डोळ्यांची मोनालिसा इतकीच चर्चा झाली. तिला वाघिण म्हणून संबोधित करण्यात आले. तिच्याविषयी एका मागून एक वृत्त आल्यावर तिला महाकुंभ सोडून पळ काढावा लागला. आता पुन्हा हर्षा समोर आली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत महाकुंभानंतर तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्याची माहिती दिली. त्यात तिला जटांमुळे काय अडचणी येत आहे. त्याची माहिती दिली.
हा सर्वात वाईट निर्णय
हर्षाने तिच्या सोशल अकाऊंटवर तिने तिच्या केसाविषयीच्या समस्या, अडचणी सांगितल्या. केसांना जटासारखं रूप देणे तिला चांगलंच महागात पडल्याचे तिने सांगितले. हा निर्णय सर्वात वाईट असल्याचे ती म्हणाली. महाकुंभापूर्वीच तिने केस जटासारखे करून घेतले. त्यावेळी असे करणाऱ्याने आपल्याला त्याचे तोटे सांगितले नाहीत. पण आपण व्हायरल झाल्यावर अनेक जणांनी अशा केसाचं श्रेय लाटल्याची माहिती तिने दिली.
जटासारखे केस झाल्याने अनेक अडचणींचा तिला त्रास झाल्याची माहिती तिने दिली. ज्यांना मायग्रेनचा, अर्धडोकेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी जटा या अडचणी वाढवणाऱ्या ठरू शकतात. तर या जटांना दर 15 दिवसांनी देखभालीची गरज असल्याचे ती सांगते. त्यासाठी पार्लरला जावे लागते असे तिने सांगितले.
View this post on Instagram
शॅम्पूचा वापर वाढला
पूर्वी केस धुण्यासाठी जो शॅम्पू वापरत होते, तो दीड महिने जात होता. पण आता जटा वाढवल्याने तिला हाच शॅम्पू तीन ते चार वेळाच वापरता येतो, असे तिने सांगितले. शॉम्पूचा वापर वाढल्याने त्यावर अधिक खर्च होत असल्याचे ती म्हणाली. तर रात्री झोपताना सुद्धा या जटांमुळे तिला अडचण होत असल्याचे ती म्हणाली. इतकेच नाही तर केस धुतल्यानंतर जटा सुखवणे हे मोठं जिकरीचे काम असल्याचं ती म्हणाला. पाणी लागल्याने जटा जड होत असल्याचे तिने सांगीतले. जटाबाबत आकर्षण असले तरी त्याचे नुकसान सांगण्याचा प्रयत्न आता तिने केला आहे.