KIIT : भारतापासून ते नेपाळपर्यंत या विद्यापीठामुळे उठले वादळ, कोण म्हटलं… 40 हजार विद्यार्थ्यांना मोफत….
KIIT Student News : या विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. तर प्राध्यापकांनी अक्कलेचे तारे तोडले आहे. एका कमेंटमुळे रामायण घडले. आत्महत्येमुळे भारतासह नेपाळपर्यंत एक वादळ उठलं आहे. काय आहे हे प्रकरण?

भारतातील एका विद्यापाठीतील प्राध्यापकांच्या करानाम्यामुळे नेपाळला मोठा धक्का बसला. या विद्यापीठामुळे भारतापासून ते नेपाळपर्यंत वादाचे वादळ उठलं आहे. या विद्यापीठातील प्राध्यापकांनी अक्कलेचे तारे तोडले आहे. एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे अगोदरच गोंधळ उडालेला असताना या प्राध्यापकांनी त्यात अजून तेल ओतण्याचे काम केले आहे. एका कमेंटमुळे रामायण घडले. तिच्या आत्महत्येमुळे भारतासह नेपाळपर्यंत एक वादळ उठलं आहे. नेपाळ सरकारने या घटनेच्या तपासासाठी दोन अधिकारी सुद्धा भारतात पाठवले आहेत. हे संपूर्ण प्रकरण ओडिशा राज्यातील प्रतिष्ठित कालिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी (KIIT) शी संबंधित आहे.
विद्यार्थिनीने केली आत्महत्या
कालिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी (KIIT) मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. प्रेमसंबंधातील वादामुळे तिने आयुष्य संपवल्याची बाब समोर येत आहे. या घटनेमुळे या कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे. नेपाळी विद्यार्थी या घटनेने घाबरून गेले आहे. त्यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी आंदोलन केले आहे.




KIIT Professor Viral Video
इतके कमी होते की काय, या विद्यापीठातील एका महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यातील चर्चेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या आगीत तेल ओतले आहे. महिला प्राध्यापक मंजूषा पांडे आणि कर्मचारी जयंती नाथ यांच्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नवीन वाद उद्भवला आहे.
या विद्यापीठाचे संस्थापक 40,000 विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि शिक्षण देतात. त्यांच्यावर इतका खर्च होतो की, तितके तर नेपाळचे राष्ट्रीय बजेट आहे, अशी प्रतिक्रिया हे दोन्ही कर्मचारी चर्चे दरम्यान देतात. यामुळे नेपाळी विद्यार्थ्यांविषयी या कॅम्पसमध्ये पूर्वग्रहदुषीत (xenophobic) मत असल्याचे समोर आले आहे.
याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठे वादळ उभे ठाकले आहे. विद्यापीठ प्रशासनाने लागलीच प्राध्यापक मंजूषा पांडे आणि जयंती नाथ यांना निलंबित केले. KIIT ने अधिकृतपणे त्यांच्या वक्तव्यावर माफी सुद्धा मागीतली आहे. प्राध्यापकांची टिप्पणी ही व्यक्तिगत होती. विद्यापीठ त्याबाबत सहमत नसल्याची भूमिका मांडण्यात आली. तसेच विद्यापीठ कोणत्याही आधारावर भेदभाव करत नसल्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
आत्महत्याप्रकरणात काय झाले?
KIIT मध्ये नेपाळच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. याप्रकरणात आतापर्यत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये या मुलीचा वर्गमित्र, तीन संचालक आणि दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी ओडिशा सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. दरम्यान नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी, नेपाळी दुतावासाचे दोन अधिकारी घटनेच्या तपासासाठी पाठवले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना थांबण्याचे अथवा परतण्याचे आवाहन केले आहे.