Chanakya Niti: चाणक्य निती सांगते, चुकूनही ‘या’ चार लोकांशी कधीही भांडू नका, अन्यथा….

चाणक्य नीति: जीवनात अनेक लोकांशी आपला संपर्क येतो. परंतु, काही लोकांशी कधीही वादविवाद करू नये. कारण त्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो. असा मोलाचा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे. जाणून घ्या, चाणक्य नितीनुसार कोणत्या लोकांशी कधीही वाद घालू नये.

Chanakya Niti: चाणक्य निती सांगते, चुकूनही ‘या’ चार लोकांशी कधीही भांडू नका, अन्यथा....
Image Credit source: TV9
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 06, 2022 | 12:11 PM

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये (In ethics) जीवनाशी संबंधित अनेक समस्यांचे समाधान सांगितले आहे. असे म्हणतात की, चाणक्य नीती पाळणाऱ्यांना आयुष्यात कमी समस्यांना सामोरे जावे लागते. चाणक्याची धोरणे आजही प्रासंगिक आहेत. चाणक्य हे अर्थशास्त्रज्ञ, राजकारण, शिक्षणतज्ञ आणि मुत्सद्देगिरीचे जाणकार मानले जातात. चाणक्याची धोरणे कठोर वाटली तरी, हीच कठोरता जीवनाचे सत्य आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चाणक्याने ‘मतिमत्सु मूर्ख मित्र गुरुवल्लभेषु विवाद नाही कर्तव्य’ या श्लोकाच्या माध्यमातून (Through verse) सांगितले आहे की, कोणाशी वाद झाल्यावर पश्चाताप करावा लागतो. रागामुळे आपली विचारशक्ती नष्ट होते. रागामुळे, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास हानी पोहोचते. चाणक्याने (Chanakya) आपल्या नीतिशास्त्रात असेही सांगितले आहे की, जीवनात चार लोकांशी आपण कधीही वाद घालू नये नाहीतर पुढे आपले नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कोण आहेत ते चार लोक.

1) पालक – असे म्हणतात की, आई-वडील जीवनाचा आधार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याशी वाद झाला तर, आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. अनेकदा पालकांशी भांडण केल्यानंतर, आपण योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखू शकत नाही आणि चुकीची संगत पकडू धरून, स्वतःचे नुकसान करून घेतो. अशा परिस्थितीत पालकांशी कधीही भांडण होऊ देऊ नये.

2) मित्र- असे म्हणतात की, मित्र तुम्हाला चांगल्या-वाईटाची जाणीव करून देतो. जर त्यांच्यात वाद झाला तर तुम्ही विश्वासू जोडीदार गमावाल आणि तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी व्यक्ती नक्कीच असते जी प्रत्येक पाऊलावर त्याच्या पाठीशी उभी असते. चाणक्यच्या मते, अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मित्राशी भांडण केले तर तो विश्वासार्ह नाते गमावतो. ज्यासाठी त्याला नेहमी पश्चात्ताप करावा लागू शकतो.

3) मूर्ख व्यक्ती- चाणक्य म्हणतो की मूर्खाशी वाद घालणे म्हणजे वेळ वाया घालवणे होय. मूर्ख माणसाला समजावून सांगायचे म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखे आहे. कारण एक मूर्ख माणूस नेहमी आपले म्हणणे मांडण्यासाठी आपले म्हणणे मांडतो आणि इतरांचे ऐकण्यास नकार देतो. असे केल्याने व्यक्तीच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होतो.

4) गुरू- गुरु हाच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो आणि जीवनात योग्य मार्ग दाखवतो. तो आपल्याला चांगल्या-वाईटाचे ज्ञान देतो. चांगल्या गोष्टी सांगतो. अशा वेळी त्यांच्याशी वाद झाला तर तुम्ही गुरूच्या कृपेपासून वंचित राहता. जीवनात गुरुचे ज्ञान सर्वात महत्त्वाचे आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा गुरु असतो. आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें