AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या स्वभावाचे व्यक्ती कायम लोकांच्या मनावर राज्य करतात, आयुष्यात कधीच पैशांची नसते कमी

आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात असे काही गुण असतात, जे एखाद्या व्यक्तीकडे असले तर असा व्यक्ती लोकांच्या मनावर राज्य करतो. त्याला त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या स्वभावाचे व्यक्ती कायम लोकांच्या मनावर राज्य करतात, आयुष्यात कधीच पैशांची नसते कमी
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 8:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे काही विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या समूहाचं नेतृत्व करतो, तेव्हा त्याच्याकडे काही खास गुण असतात, त्यामुळेच ती योग्यता त्याला प्राप्त होते. सिंहाला उगच जंगलाचा राजा म्हटलं जात नाही, कारण त्याच्याकडे ते खास गुण आहेत. सिंहाचा तसा दरारा आहे. त्याच प्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये काही विशिष्ट गुण असतात, तेव्हा लोक स्वत:हून अशा लोकांचं नेतृत्व मान्य करतात, असे लोक आयुष्यभर दुसऱ्यांच्या मनावर राज्य करतात. तसेच या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात की चाणक्य यांनी असे कोणते गुण सांगितले आहेत, जे एखाद्या विशिष्ट समूहाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे असायलाच हवेत.

नम्रता – चाणक्य म्हणतात नम्रता हा असा गुण आहे, तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता. नम्र असणं हे कधीही भित्र्या माणसाचं लक्षण नाहीये, तर नम्रता हा खऱ्या अर्थाने साहसी लोकांकडे असलेला सर्वात मोठा गुण आहे. अनेकदा तुमच्याकडे थोडा पैसा येतो, किंवा ताकद येते, तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशांचा, ताकदीचा गर्व होतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा गर्व होतो, तेव्हा तिथेच तुमचा पराभव निश्चित झालेला असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीचा गर्व होतो, तेव्हा तो आंधळा होतो. त्याला आपल्या समोर काय चाललं आहे? हे देखील नीट दिसत नाही, त्यामुळे त्याचेच लोक त्याच्या विरोधात जातात, आणि एक दिवस त्याचा पराभव होतो. हा पराभव असा असतो की त्यामध्ये तुम्ही तुमचं सर्व गमावून बसतात, म्हणूनच म्हणतात गर्वाचं घर खाली असतं, त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात यश मिळवायचं असेल तर नम्रता ही तुमच्या अंगी हवीच असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम – चाणक्य म्हणतात संयम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही या जगातील कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही लगेच प्रयत्न सोडून देऊ नका, तर प्रयत्न करत राहा, हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे. जे लोक संयमी असतात ते कालातंराने जगावर राज्य करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संवादशैली -चाणक्य म्हणतात जे लोक जगावर राज्य करतात, लोकांच्या मनात घर करतात, त्यांची संवादशैली ही आकर्षक असते. ते आपल्या बोलण्यातून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा