AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे 3 लोक कायम गरीब राहतात, शेवटच्या श्वासापर्यंत पैशांसाठी तरसतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसांच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, त्या जर सवयी एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर तो कायम गरीब राहतो, अशा माणसाजवळ कधीच पैसा टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti : हे 3 लोक कायम गरीब राहतात, शेवटच्या श्वासापर्यंत पैशांसाठी तरसतात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 7:43 PM
Share

आर्य चाणक्य हे भारतामधील एक महान अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कधी आणि कुठे खर्च करावा? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाच्या अशा तीन सवयी सांगितल्या आहेत, त्या जर कुठल्याही व्यक्तीमध्ये असतील तर असा माणूस आयुष्यभर गरीब राहतो, त्याच्या हातात कधीच पैसा टिकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

कायम दुसर्‍यावर अवलंबून राहणं – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही, मात्र जे लोक कायम कष्ट टाळतात, जे कायम आपल्या छोट्या-छोट्या गरजांसाठी देखील इतर लोकांवर अवलंबून असतात. स्वत: पैसा कमवत नाही, असे लोक कायम गरीब राहतात, असे लोक ज्या व्यक्तीवर अवलंबून आहेत, तो व्यक्ती देखील यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मदत करतो, मात्र त्यानंतर अशा लोकांचं आयुष्य हे खूप बिकट बनतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रागीट स्वभावाची माणसं – चाणक्य म्हणतात तुम्हाला कोणतीही नोकरी करायची असेल किंवा व्यवसाय करायचा असेल, त्यामध्ये प्रगती करायची असेल तर सर्वात आधी एक नियम लक्षात घ्या तो म्हणजे तुमच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे, म्हणजे समोरच्या माणसांना गोड बोलून आपलं काम आपल्याला करून घेता आलं पाहिजे, मात्र जे लोक स्वभावाने फटकळ असतात रागीट असतात असे लोक चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय किंवा नोकरी करू शकत नाहीत.

आळशी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, ते लोक देखील आयुष्यभर गरीबच राहतात. कारण आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुम्हाला प्रगती करायची असेल, भरपूर पैसा कमवायचा असेल तर आळसाचा त्याग करून कष्ट करावे लागतील त्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......