Chanakya Niti : श्रीमंत व्हायचंय? मग हे 4 काम नक्की करा, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये श्रीमंतीचं सूत्र सांगितलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा फायदा हा अपल्याला आजही आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन करताना होतो. चाणक्य म्हणतात जगात असे अनेक लोक आहेत, जे पैसा खूप कमवतात, पण त्यांच्या हातात पैसाच टिकत नाही, तर दुसरीकडे असेही लोक आहेत, जे प्रचंड कष्ट करतात पण दिशा चुकल्यामुळे त्यांना आपल्या कष्टाचा अपेक्षित मोबदला मिळत नाही, अशा लोकांनी काय करावं? यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी बेडवर जातात, तेव्हा लगेच झोपू नका, तर हा विचार करा आजचा तुमचा दिवस कसा गेला? दिवसभर तुम्ही काय -काय केलं? तुमच्या कोणत्या गोष्टी चुकल्या आणि तुम्ही कुठे बरोबर होतात. तुम्ही दिवसभर जे कष्ट केले तर त्याचा अपेक्षित मोबदला तुम्हाला मिळाला आहे का? नसेल मिळाला तर तुमचं नेमकं काय चुकलं? असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
चाणक्य ज्ञान वाढवण्याचा सल्ला देतात, चाणक्य म्हणतात ज्ञान हीच खरी संपत्ती असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास तरी एखादं चांगलं पुस्तक वाचा, हेच ज्ञान भविष्यात तुमच्या उपयोगी पडणार आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही पैसे देखील कमवू शकता.
चाणक्य म्हणतात त्यानंतर तुम्ही आपल्याला आता उद्या सकाळी नक्की काय करायचं आहे? कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे? दिवसभर कोण-कोणती कामं करायची आहेत? याचं योग्य नियोजन बनवा.
तसेच तुमच्या दिवसाचा शेवट हा सकारात्मक विचाराने करा आज मला माझ्या कामात जेवढं यश मिळालं आहे, त्याहीपेक्षा जास्त यश मला उद्या मिळेल, असा विचार करून तुम्ही झोपी जा, त्यामुळे तुमचा उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा घेऊन उगवेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
