Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर ‘हे’ काम करायला अजिबात विसरु नका, सुख, समृद्धी आणि विशेष मिळेल पुण्य
Chandra Grahan 2025: वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण... ग्रहण संपल्यानंतर 'ही' कामे करायला अजिबात विसरू नका... फक्त सुध, समृद्धी नाही तर, विशेष पुण्याचा होईल लाभ... जाणून घ्या ग्रहण संपल्यानंतर नक्की करायचं तरी काय?

Chandra Grahan 2025: देशात आज वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण होणार आहे. रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरु होणार असून 8 सप्टेंबर रोजी रात्री 1.26 वाजता समाप्त होणार आहे. भारतात ग्रहण काळासंबंधी अनेक मान्यता आहेत. ग्रहण काळात काय करावं, काय करु नये? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रग्रहणानंतर कोणती कामे करावीत ज्यामुळे आनंद, समृद्धी आणि विशेष लाभ मिळेल याबद्दल जाणून घ्या…
विद्वान पं. महेंद्र तिवारी यांनी सांगितल्यानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी देव ग्रहांच्या प्रभावाने वेढलेला असतो. अशा परिस्थितीत भजन आणि कीर्तन करावं. चंद्रग्रहण संपल्यानंतर स्थान करणं देखील फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर, देवाची विशेष पूजा करावी. जर चंद्रग्रहण रात्री उशिरा संपत असेल तर घरातील मंदिरात किंवा प्रार्थना कक्षात देवाची पूजा करावी… असं देखील सांगितलं जातं.
विद्वान पं. महेंद्र तिवारी यांनी सांगितल्यानुसार, चंद्रग्रहण संपल्यानंतर शक्य असल्यास दान केल्याने देखील पुण्य प्राप्त होतं. दान केल्यामुळे देव अतिप्रसन्न होतात आणि इच्छित परिणाम प्रदान करतात. कपडे, धान्य आणि दागिने इत्यादींच्या रुपात फळ प्राप्त होऊ शकतं…
एवढंच नाही तर, कुंडलीमध्ये चंद्रग्रहण असेल तर, चांदे आभूणष किंवा चांदीची नाणी दान करावीत. असं केल्यानं तुमचा चंद्र बलवान होतो. मानसिक ताणासोबतच तुम्हाला संपत्ती देखील मिळते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार इतर दागिने दान करू शकता.
सांगायचं झालं तर, चंद्र पांढरा असतो. अशात पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्या पाहिजे… कोणत्याही वस्तू दान करायच्या असतील तर ग्रहण सुरू होण्यापूर्वी त्यांना स्पर्श करावा आणि ग्रहणानंतर ते दान करा. चंद्रग्रहणाच्या वेळी धान्य दान करणं देखील खूप पवित्र मानलं जातं. गहू असो वा तांदूळ, तुम्ही मूग डाळ किंवा इतर अन्नपदार्थ देखील दान करू शकता.
अन्नधान्य दान केल्याने तुमच्या घरात कसलीच कमतरता भासणार नाही.. अशी पौराणिक मान्यता आहे. पितृपक्ष चंद्रग्रहणापासून सुरू होत आहे असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गाईचे दूध, गंगाजल, काळे तीळ आणि जव इत्यादी दान करू शकता. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतात.
