AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या प्रभावी मंत्राचा रोज 7 वेळा करा जाप, बजरंगबलीच्या कृपेने मिळतील चमत्कारीक लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक मंत्र सांगण्यात आला आहे. असे म्हणतात की हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. या मंत्रात भगवान राम आणि त्यांचे भक्त हनुमान जी यांची स्तुती करण्यात आली आहे.

या प्रभावी मंत्राचा रोज 7 वेळा करा जाप, बजरंगबलीच्या कृपेने मिळतील चमत्कारीक लाभ
हनुमानImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 11, 2023 | 8:58 AM
Share

मुंबई : बजरंगबली हनुमानाचे (Bajrangbali Hanuman) नाव घेतल्यानेदेखील संकट दूर होते असे म्हणतात. केवळ मंगळवारच नाही तर आठवड्यातील सातही दिवस हनुमानजींचे नामस्मरण केले आणि स्मरण केले तर प्रत्येक कामातले अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. असे मानले जाते की बजरंगबलीचे खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने स्मरण केल्यास देव भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. शास्त्रात असे अनेक मंत्र आणि तंत्र सांगितल्या गेले आहेत, ज्याचा वापर करून बजरंगबली सहज प्रसन्न होऊ शकतात. तुलसीदासांनी रचलेल्या रामचरितमानसमध्ये अनेक मंत्रांचा वापर चौपाईच्या स्वरूपात करण्यात आला आहे. या मंत्रांचा जाप (Effective Mantra) विधी व नियमांसोबत केल्यास समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

या उपायाने हनुमानजी प्रसन्न होतील

ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक मंत्र सांगण्यात आला आहे. असे म्हणतात की हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. या मंत्रात भगवान राम आणि त्यांचे भक्त हनुमान जी यांची स्तुती करण्यात आली आहे. या मंत्रात 3 श्लोक आहेत. ज्यामध्ये भगवंताची आराधना करताना त्याच्या अपार, अखंड भक्तीची मागणी करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या मंत्राविषयी.

या मंत्राचा करा जाप

शान्तं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुम्‌।

रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम्‌॥1॥

नान्या स्पृहा रघुपते हृदयेऽस्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा। भक्तिं प्रयच्छ रघुपुंगव निर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च॥2॥

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्‌। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥3॥

असा करा मंत्र जाप

या मंत्राचा योग्य प्रकारे जप केला तरच त्याचे फायदे मिळतात. हनुमान चालिसानंतर हा श्लोक रोज 7 वेळा पाठ केला जातो. या मंत्राचा जप करताना त्यांच्याकडून काहीही मिळवण्याची इच्छा करू नका आणि त्यांच्याकडे काहीही मागू नका. असे अनेक दिवस सतत केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. यासोबतच हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही हा विधी कराल तेव्हा सात्वीक जीवन जगा. ब्रह्मचर्याचे पालन करा. तसेच आहार शुद्ध ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.