Devshayni ekadashi 2022: देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंच्या ‘या’ तीन मंत्रांचा करा जप; घरात येईल सुख समृद्धी

देवशयनी एकादशीला (devshayni ekdashi 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूला समर्पित हे एकादशी व्रत (ekadashi vrat) दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. यावर्षी देवशयनी एकादशीचे व्रत 10 जुलै 2022 रोजी आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून चार महिने योगनिद्रात जातात, म्हणून तिला हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. तसेच या […]

Devshayni ekadashi 2022: देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंच्या 'या' तीन मंत्रांचा करा जप; घरात येईल सुख समृद्धी
नितीश गाडगे

|

Jul 05, 2022 | 9:20 AM

देवशयनी एकादशीला (devshayni ekdashi 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूला समर्पित हे एकादशी व्रत (ekadashi vrat) दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. यावर्षी देवशयनी एकादशीचे व्रत 10 जुलै 2022 रोजी आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून चार महिने योगनिद्रात जातात, म्हणून तिला हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. तसेच या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंडन इत्यादी इतर शुभ कार्य करणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, भगवान विष्णू योगनिद्रामध्ये गेल्यानंतर या सृष्टीचे कार्य महादेव सांभाळतात. दुसरीकडे, देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी या 3 विशेष मंत्रांचा जप केल्याने भगवान श्री हरींच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी येते.

देवशयनी एकादशी व्रताचा संकल्प मंत्र-

सत्यस्थ: सत्यसंकल्प: सत्यवित् सत्यदस्तथा। धर्मो धर्मी च कर्मी च सर्वकर्मविवर्जित:।। कर्मकर्ता च कर्मैव क्रिया कार्यं तथैव च। श्रीपतिर्नृपति: श्रीमान् सर्वस्यपतिरूर्जित:।।

भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मंत्र-

सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत सुप्तं भवेदिदम। विबुद्धे त्वयि बुध्येत जगत सर्वं चराचरम।

क्षमा याचना मंत्र-

भक्तस्तुतो भक्तपर: कीर्तिद: कीर्तिवर्धन:। कीर्तिर्दीप्ति: क्षमाकान्तिर्भक्तश्चैव दया परा।।

देवशयनाचे वैज्ञानिक महत्त्व

संस्कृत साहित्यात “हरी” हा शब्द विशेषतः भगवान विष्णू, सूर्य, चंद्र आणि वायूसाठी वापरला जातो. चातुर्मासादरम्यान, सूर्य, चंद्र, वायु इत्यादी या सर्व प्रमुख शक्ती मंदावतात आणि वातावरणात त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या घटकांची कमतरता असते. यामुळे आपल्या शरीरात बरेच बदल होतात आणि आपली पाचन शक्ती कमकुवत होते. शास्त्रात भगवान हरी सर्वव्यापी मानले गेले आहेत. आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या तीन गुणांपैकी सत्त्वगुणाला आणि शरीरातील सात प्रमुख धातूंमध्ये पित्तला भगवान हरींचे प्रतिनिधी मानले जाते. अशा परिस्थितीत हा काळ हरीची उपासना करण्याचा खास काळ मानला जातो आणि व्यक्तीला सात्त्विक अन्न खाण्याचा आणि सात्विक जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्य दक्षिणायन होतो

त्याचवेळी खगोलशास्त्रीय कारणांमुळे सूर्य कर्क राशीत दाखल होत दक्षिणायन झाले आहे आणि पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. कर्क राशी जलीय राशी आहे. अशा स्थितीत सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होते. यावेळी सूर्याची शक्ती कमकुवत होते. ही वेळ देवतांची रात्र मानली जाते. असे म्हणतात की या दरम्यान सर्व देवी-देवता योग निद्रेमध्ये जातात. कार्तिक महिन्यात पोहोचल्यावर सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो. याच्या जवळपासच देवउठनी एकादशी असते. देवउठनी एकादशी हा देवतांच्या जागृतीचा दिवस मानला जातो. या दिवसापासून सर्व धार्मिक नियम पुन्हा लागू केले जातात आणि पुन्हा शुभ कार्य सुरु होतात.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें