Powerful Gayatri Mantra : सर्व इच्छा पूर्ण करणारे गायत्री मंत्र, जाणून घ्या या दिव्‍य मंत्राचे महाउपाय

सनातन परंपरेत वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. त्या सर्व मंत्रांमध्ये, गायत्री मंत्र - ‘ॐ भूर्भव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्’ याचं एक विशेष स्थान आहे. देवी गायत्री ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं स्वरुप मानली जाते.

Powerful Gayatri Mantra : सर्व इच्छा पूर्ण करणारे गायत्री मंत्र, जाणून घ्या या दिव्‍य मंत्राचे महाउपाय
Gayatri mantra
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 1:21 PM

मुंबई : सनातन परंपरेत वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. त्या सर्व मंत्रांमध्ये, गायत्री मंत्र – ‘ॐ भूर्भव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्’ याचं एक विशेष स्थान आहे. देवी गायत्री ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं स्वरुप मानली जाते. असे मानले जाते की चारही वेद, पुराणे, श्रुतींची उत्पत्ती गायत्रीपासून झाली आहे. म्हणून त्यांना वेदमाता असेही म्हणतात.

अनेक ऋषींनी देवी गायत्रीच्या मंत्राच्या महिमेबद्दल सांगितले आहे. गायत्री महामंत्रात तीन वेदांचे सार आहे. जप केल्याने सर्वात मोठ्या पापांपासून मुक्ती मिळते. या मंत्राची दिव्य शक्ती नरकात असलेल्या व्यक्तीलाही बाहेर काढण्यात सक्षम आहे. गायत्री मंत्राशी संबंधित उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे मानवाच्या जीवनात चमत्कारिक बदल होतात –

? जर तुम्हाला सत्ता किंवा सरकारकडून काही लाभ मिळण्याची अपेक्षा असेल, तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बेलाच्या झाडाखाली रोज गायत्री मंत्राची एक माळ जपायला हवी. या उपायाने तुम्हाला सरकारी सेवेचा लाभ मिळेल.

? दीर्घायुष्य आणि आरोग्यप्राप्तीसाठी दोन महिन्यांपर्यंत दररोज हजार वेळा गायत्री मंत्राचा जप करावा.

? जर तुम्हाला धन देवीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही या मंत्राचा सतत तीन महिने जप करावा.

? जर तुम्ही आर्थिक अडचणींशी झुंज देत असाल आणि तुम्हाला देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर गायत्री मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी वरदान ठरु शकते. देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी108 वेळा गायत्री मंत्राचा जप करत हवन कुंडात लाल फुलांची आहुती द्यावी .

? शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारची भीती, भूत बाधा, अडथळ्यांपासून मुक्ती मिळते.

? जर तुम्ही कोणत्या आजाराने खूप त्रस्त असाल आणि बऱ्याच उपचारानंतर तुम्ही त्या रोगापासून मुक्त होऊ शकत नसाल. तर अंगठ्या इतका गिलोयचे तुकडे घ्या आणि ते गाईच्या दुधात मिसळा. यानंतर, गायत्री मंत्राचा जप करताना हवन कुंडात गिलोयच्या या तुकड्यांची 108 आहुती त्या. आपल्या उपचारासह गायत्री मंत्राचा हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच आरोग्य लाभ मिळतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कुठलंही काम करण्यापूर्वी आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा, यश नक्की मिळेल

Sapphire Gem | या परिस्थितींमध्ये जर नीलम रत्न परिधान केला तर तुमचा संपूर्ण विनाश होऊ शकतो

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.