Sapphire Gem | या परिस्थितींमध्ये जर नीलम रत्न परिधान केला तर तुमचा संपूर्ण विनाश होऊ शकतो

ज्योतिषशास्त्रात नीलम रत्न अतिशय शक्तिशाली मानले जाते. हे रत्न शनि ग्रहाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की नीलममध्ये इतकी शक्ती आहे की ती एखाद्या व्यक्तीला रंक ते राजा बनवू शकते. पण, जर गरज नसलेल्या व्यक्तीने नीलम परिधान केले तर हे रत्न त्याचे अशुभ परिणाम देऊ लागते आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण विनाश होते.

Sapphire Gem | या परिस्थितींमध्ये जर नीलम रत्न परिधान केला तर तुमचा संपूर्ण विनाश होऊ शकतो
नीलम रत्न

मुंबई : ज्योतिषशास्त्रात नीलम रत्न अतिशय शक्तिशाली मानले जाते. हे रत्न शनि ग्रहाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की नीलममध्ये इतकी शक्ती आहे की ती एखाद्या व्यक्तीला रंक ते राजा बनवू शकते. पण, जर गरज नसलेल्या व्यक्तीने नीलम परिधान केले तर हे रत्न त्याचे अशुभ परिणाम देऊ लागते आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण विनाश होते. म्हणून ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर त्याच्या सूचनांनुसार नीलम परिधान करा. जेणेकरुन, त्याचे दुष्परिणाम टाळता येतील. कोणत्या परिस्थितीत नीलम रत्न परिधान करावा आणि कोणत्या परिस्थितीत करु नये हे जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते नीलम हे शनिचे प्रतिनिधित्व करते, अशा स्थितीत कुंडलीत शनिच्या स्थितीनुसार नीलम धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जर शनि दुर्बल झाला असेल किंवा दुर्बल घरात असेल, व्यक्तीला साडेसाती, शनिच्या त्रासातून जावे लागत असेल तर अशा परिस्थितीत शनिच्या वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याला शुभ फळ देण्याइतकं लायक बनवण्यासाठी तज्ञ नीलम परिधान करण्याचा सल्ला देऊ शकतात. शनी चौथ्या, पाचव्या, दहाव्या किंवा अकराव्या घरात असेल तर नीलम घालता येते. परंतु केवळ या माहितीच्या आधारे नीलम घालू नका. तुमची कुंडली एखाद्या ज्योतिषाला दाखवल्यानंतर फक्त त्यांच्या सल्ल्यानेच ते परिधान करा.

नीलमचे शुभ परिणाम

नीलम रत्नाचा प्रभाव फार लवकर दिसतो. जर नीलम रत्नाचा शुभ परिणाम झाला तर नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ लागते. एखादी व्यक्ती दिवसेंदिवस प्रगती करते. वंश वृद्धी होते. प्रतिष्ठेत वाढ होते. आरोग्य चांगले राहाते. प्रकरणे इत्यादी सहजपणे निकाली लागतात आणि आरोग्य चांगले असते.

अशा परिस्थितीत कधीही नीलम घालू नका

ज्योतिषाच्या मते, जर कुंडलीत शनि योग्य स्थितीत नसेल तर विसरुनही नीलम परिधान करु नये. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि-राहू आणि शनि-मंगळ सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असतील तर ही स्थिती शुभ मानली जात नाही. याशिवाय, शनि हा कुंभ आणि मकर राशीचा स्वामी आहे. जरी या राशींची स्थिती योग्य नसली तर नीलम परिधान करु नये अन्यथा अशुभ परिणाम मिळू शकतात.

अशुभ असल्यास होतो संपूर्ण विनाश

ज्योतिषाचार्यांच्या मते, अशुभ स्थितीत नीलम धारण केल्याने व्यक्तीला सर्व बाजूंनी संकटांचा सामना करावा लागतो आणि त्याचा सर्वविनाश होण्यात वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत व्यर्थ भांडणे, वैर आणि वादविवाद वाढतात. प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात आणि काम पूर्णत्वास आलेले असताना काम बिघडते. आर्थिक नुकसान अशा प्रकारे होते की व्यक्ती विनाशाच्या मार्गावर येतो. या व्यतिरिक्त, घरात आजारांवर मोठ्याप्रमाणात पैसा खर्च होतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu tips for water : तुम्हाला माहित आहे का पाण्याचा वास्तु नियम, याकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते गरिबी

Hanuman Ji Puja Tips | हनुमानजींची पूजा करताना नेहमी दिशांचे नियम पाळा, जाणून घ्या कुठल्या दिशेने कुठले चित्र लावावे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI