Ramayana | रामायणाच्या त्या एपिसोडमध्ये असं काय दाखवलं, की लॉकडाऊनमध्ये 7.7 कोटी प्रेक्षकांनी तो पाहिला

कोरोनाचं संकट सतत वाढत आहे. बर्‍याच राज्यात लॉकडाऊनही लावण्यात आले आहे (Episode In Ramayana) आणि पुन्हा एकदा लोक घरात बंदिस्त झाले आहेत.

Ramayana | रामायणाच्या त्या एपिसोडमध्ये असं काय दाखवलं, की लॉकडाऊनमध्ये 7.7 कोटी प्रेक्षकांनी तो पाहिला
RAMAYANA

मुंबई : कोरोनाचं संकट सतत वाढत आहे. बर्‍याच राज्यात लॉकडाऊनही लावण्यात आले आहे (Episode In Ramayana) आणि पुन्हा एकदा लोक घरात बंदिस्त झाले आहेत. आता पुन्हा एकदा मागील वर्षाच्या लॉकडाऊनची आठवण येऊ लागली आहे. कारण गोष्टींची त्याच प्रकारे पुनरावृत्ती होत आहे. अगदी रामायणासारख्या मालिकांनीही दूरदर्शनवरुन पुन्हा प्रसारण सुरि केले आहे. रामायण, महाभारत अनेक वाहिन्यांवर दाखविली जात आहे, जसं मागील लॉकडाऊनमध्ये झालं होतं (Do You Know About That Episode In Ramayana Telecasted On 16th April 2020 Who Was In Number 1 On TRP).

तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी दूरदर्शनवर रामायण प्रसारित झाले तेव्हा दूरदर्शनने कित्येक आठवडे टीआरपी रेकॉर्ड मोडले. लोकांना रामायण खूप आवडले आणि बर्‍याच लोकांनी रामायण आणि महाभारत टीव्हीवर पाहिले. यादरम्यान, 16 एप्रिल रोजी प्रसारित झालेला एक भाग, ज्याने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. तो भाग सर्वाधिक पाहिला गेला होता. आपल्याला माहित आहे की त्या भागामध्ये असं काय खास होतं आणि किती लोकांनी तो भाग पाहिला होता.

हा भाग किती लोकांनी पाहिला?

दूरदर्शनने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी जगभरात प्रसारित झालेला हा भाग 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिला आणि त्यानंतर ती सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनली.

त्या भागात काय दाखवले गेले होते?

16 एप्रिलला त्या दिवशी रामायणात मेघनादद्वारे लक्ष्मणला शक्ती बाण मारल्यानंतर भाग दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये हनुमान विभिषणच्या सांगण्यावरुन लंकेला जातो आणि वैद्यला घेऊन येतो आणि वैद्यच्या सांगण्यावरुन हनुमान संजीवनी बूटीसाठी संपूर्ण पर्वतच उचलून घेऊन येतो. याबरोबरच हनुमान पर्वत आणण्यासाठी गेला आहे याबाबत रावण आणि मेघनादचे संवादही आहेत. यासह, लक्ष्मण यांच्या उपचाराचा सीनही दाखवण्यात आलं होतं. रामायणातील हे दृश्य प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंत पडले.

गेल्या वर्षी रामायण, लवकुश, श्रीकृष्ण असे कार्यक्रम अनेक आठवड्यांपासून टीआरपीच्या यादीत होते. आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती निर्माण होत आहे, कारण लॉकडाऊन आणि वाढत्या कोरोना विषाणूमुळे इतर प्रोग्राम्स शूट केले जात नाहीत. यामुळे रामायण सारख्या मालिका पुन्हा एकदा प्रसारित केल्या जात आहेत. रामानंद सागर यांचे रामायण, महाभारत इत्यादी अनेक वाहिन्यांवरुन प्रसारित होत आहेत.

Do You Know About That Episode In Ramayana Telecasted On 16th April 2020 Who Was In Number 1 On TRP

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल

Ravana | रावणाचा जन्म कसा झाला? ब्राह्मण पुत्र कुठल्या घटनेमुळे राक्षस ठरला? जाणून घ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI