ही मूर्ती चुकूनही घरात ठेवू नका; राजाचाही होतो रंक, घरात कारण नसतानाही होतात वाद
हिंदू धर्मात वास्तु शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. अनेक जण आपलं घर हे वास्तु शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार बांधतात, मात्र घरातील वस्तू या वास्तु शास्त्रानुसार ठेवत नाहीत

हिंदू धर्मात वास्तु शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. अनेक जण आपलं घर हे वास्तु शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार बांधतात, मात्र घरातील वस्तू या वास्तु शास्त्रानुसार ठेवत नाहीत, अशा कुटुंबाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. तसेच ज्योतिष शास्त्रात आणि वास्तु शास्त्रामध्ये अशा काही वस्तू, मूर्ती, झाडं, पेंटिग सांगितल्या आहेत ज्या घरात ठेवल्यामुळे संबंधित कुटुंबात गृहकलह वाढू शकतो, पैशांची अडचण जाणून शकते.घरात अशांतता राहाते आज आपण अशाच एका मूर्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
शनीची मूर्ती घरात नसावी असं शास्त्र सांगतं त्यामागे मोठी आख्यायिका आहे, शनी देवांना श्राप मिळाला होता. ज्याच्यावर शनीची दृष्टी पडेल त्याचा वाईट काळ सुरू होईल, त्याच्या आयुष्यात काही अप्रिय घटना घडतील. त्यामुळे शनीची मूर्ती घरात नसावी असं शास्त्र सांगतं. त्यामुळेच जर तुम्हाला शनीचं दर्शन जरी घ्यायचं झालं तरी शनीचं दर्शन हे समोरून न घेता डाव्या किंवा उजव्या बाजुने उभं राहून घेतलं जातं.त्यामुळे शनी देवांची मूर्ती तुमच्या घरी असलेल्या देवघरात नसावी असं शास्त्र सांगतं.
तसेच तुम्ही जर शनी देवांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलात तर दर्शन घेताना एक काळजी घ्यावी की कधीही शनी देवांच्या डोळ्याकडे पाहून त्यांचं दर्शन घेऊ नये.तसेच शनी देवांची पूजा ही कधीही त्यांच्या समोर बसून न करता मूर्तीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बसून करावी.जर तुम्हाला घरात शनी देवांची मूर्ती ठेवायची असेल तर त्यापूर्वी एकदा धार्मिक ग्रथांचा अभ्यास असणाऱ्यांचा किंवा पंडितांचा सल्ला अवश्य घ्यावा.शनी देवाला तेल हे अतिशय प्रीय असते, शनी देवाचा त्रास कमी करायचा असेल तर शनीच्या मूर्तीला तेलानं स्नान घालावं तसेच मारूतीची उपासना करावी असा सल्ला देखील दिला जातो.
शनी प्रमाणेच घरात नटराजची देखील मूर्ती नसावी. नटराजची मूर्ती ही तांडव नृत्याच्या मुद्रेत असते. त्यामुळे या मुर्तीमुळे घरात वाद होतात असं शास्त्रात सांगितलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
