तुमच्याही हातात पैसा टिकत नाही? मग या तीन चुका टाळाच, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
अनेकजण प्रचंड मेहनत करतात, मात्र तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, पैसा घरात येण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्या घरात पैसा आला पाहिजे, तो टिकला पाहिजे, अपल्यावर कोणतंही आर्थिक संकट येऊ नये. मात्र असे अनेक लोक असतात त्यांनी कितीही मेहनत केली, पैसा कमावला तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. महिन्याचे पहिले काही दिवस त्यांच्याकडे पैसे असतात, मात्र महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे एकही रुपया उरत नाही. ते पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र तरी देखील त्यांना हे कळत नाही की पैसे जातात कुठे? चुक नेमकी कुठे होत आहे. आपण अशा काही चुका करतो ज्याचा परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात ज्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. या गोष्टी तुम्ही नकळत जरी केल्या तरी तुमच्या धनाची हानी होते. या चुका तुम्हाला छोट्या वाटतात, मात्र त्याचे परिणाम हे गंभीर स्वरुपाचे असू शकतात. जाणून घेऊयात त्या तीन चुका ज्याचा फटका तुम्हालाही बसू शकतो.
मंगळवारी पैसे घेणे – मंगळवारी कर्ज घेणं ही ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात मोठी चुक आहे. ही चूक अनेक लोक करतात. मंगळवारचा संबंध हा मंगळ ग्रहाशी असतो. या ग्रहाला ऋण आणि वादाचा कारक ग्रह मानलं जातं. त्यामुळे तुम्ही जर मंगळवारी कोणाकडून कर्ज घेत असाल किंवा एखादा मोठा आर्थिक व्यवहार करणार असाल तर तो करू नका, कारण या दिवशी घेतलेलं कर्ज अनेक दिवस तुमच्यावर राहू शकतं. त्यामुळे मंगळवारी कर्ज न घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे.
शुक्रवारी पैसे देणे – शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहे. शुक्रवारला धन, वैभव, सुख आणि शांतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये, अथवा पैसे देऊ नये, असं मानलं जातं.जर तुम्हाला एखाद्याला पैसे द्यायचेच असतील तर शुक्रवार सोडून तुम्ही ते इतर कोणत्याही वारी देऊ शकतात.
संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका – ज्योतिष शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे न देण्याचा सल्ला दिला जातो. सध्यांकाळच्यावेळी आपण घरात दिवा लावतो, देवाची प्रार्थना करतो. घरात सकारात्मक वातावरण असतं त्यामुळे अशावेळी कोणालाही पैसे देणं टाळावं, एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर ते सकाळी किंवा दुपारच्या वेळी द्यावेत.
या गोष्टी लक्षात ठेवा –
पैशांचे व्यवहार करताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं ज्योतिषशास्त्र सांगतं, कोणालाही रात्रीच्यावेळी पैसे देऊ नये, तसेच मंगळवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, व शुक्रवारी कोणालाही पैसे देऊ नये.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
