Eid Milad-un-Nabi 2021 : ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, काय काय आहेत अटी आणि नियम

पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने केवळ 25 लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त 5 वाहने आणि 25 लोकांना परवानगी देणे अयोग्य आहे. हे दर्शवते की सरकार त्यांच्या समाजासोबत पक्षपात करत आहे.

Eid Milad-un-Nabi 2021 : ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, काय काय आहेत अटी आणि नियम
Eid Milad-un-Nabi 2021

मुंबई : पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने केवळ 25 लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त 5 वाहने आणि 25 लोकांना परवानगी देणे अयोग्य आहे. हे दर्शवते की सरकार त्यांच्या समाजासोबत पक्षपात करत आहे.

रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी म्हणाले की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने 10 ट्रक आणि 150 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

ते म्हणाले की, आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. उच्च न्यायालयाने किमान जास्तीत जास्त लोकांना चेहल्लूम जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती. नूरी म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. त्यांना आशा आहे की सोमवारपर्यंत राज्य सरकार आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करेल.

मौलाना झहीर अब्बास रिझवी म्हणाले की, सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करण्यापूर्वी ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या महत्त्वाचा विचार करायला हवा होता. हा वर्षातील एक दिवस आहे जेव्हा मुस्लिम समाजातील लोक मोठ्या आतुरतेने पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात. सरकारने फक्त 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. ही श्रद्धेची बाब आहे, जुलूसमध्ये आपेक्षा अधिक जण पायी सामील होऊ शकतात. त्यामुळे, उच्च न्यायालयाने दिलेली परवानगी आणि शहरातील सध्याची साथीची परिस्थिती पाहता राज्य सरकारने चहेल्लूम जुलूसमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय?

मुस्लिम समाजातील लोकांनी शक्य तेवढं घरी राहून हा सण साजरा करावा

जुलूस काढण्यासाठी आयोजकांना स्थानिक पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल

मिरवणुकीत फक्त 5 ट्रकना परवानगी आहे.

एका ट्रकमध्ये फक्त 5 लोकांना परवानगी आहे.

जुलूसमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल.

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

जुलूसच्या स्वागतासाठी जर पंडाल बनवायचा असेल तर नियमांनुसार महानगरपालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. पंडालमधील व्यक्तींची संख्या स्थानिक प्रशासन ठरवेल.

कंटेनमेंट झोनमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

स्थानिक परिस्थिती पाहता, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Eid al-Adha 2021 | आज बकरी ईद , जाणून घ्या याची कहाणी आणि महत्त्व

Bakrid 2021 Guidelines Maharashtra : ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI