घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ उपायांचे पालन
Kuber Upay for Finance: कुबेराला धन संपत्तीचे स्वामी मानले जाते. मान्यतेनुसार, लक्ष्मी देवीची आणि कुबेराची पूजा केल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासण्याचे कारण म्हणजे वास्तूदोष. तर वास्तूदोष कमी करण्यासाठी आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही खास नियमांचे पालन करू शकता.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी देवीची कृपा असली पाहिजेल. लक्ष्मी देवीला धनाची देवी मानले जाते. ज्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो त्या घरामध्ये कधीच आर्थिक चणचण भासत नाही. त्यासोबतच ज्या घरामध्ये प्रसन्न मनानी पूजा केल्यामुळे त्या घरातील वातावरण सुखी आणि समृद्धी राहाते. लक्ष्मी देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, असे काही नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असतात. शास्त्रानुसार, काही विशेष काम केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या कामामघघ्ये प्रगती होते.
हिंदू धर्मात, वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला विशेष स्थान आहे. ही दिशा भगवान कुबेर यांचे निवासस्थान मानली जाते. कुबेर धन आणि संपत्तीचे स्वामी आहे. ईशान्य दिशा स्वच्छ ठेवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या घरातील ईशान्य दिशेला पूजास्थळ बनवणे सर्वोत्तम मानले जाते. घरातील मंदिराचं प्रार्थनास्थळ नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. याशिवाय, जड वस्तू देखील ईशान्य दिशेला चकूनही ठेवू नयेत. या दिशेला जड वस्तू ठेवल्याने आर्थिक समस्या निर्माण होतील.
घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. घराच्या उत्तरेकडे कुबेर यंत्र स्थापित केल्याने आर्थिक समृद्धी येते आणि घरातील वातावरण प्रसन्न होते. कुबेर देवाला धन संपत्तीचे स्वामी मानले जाते त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. शास्त्रामध्ये, कुबेराची पूजा करण्याचे काही विशेष नियम आहेत. यंत्राच्या रूपात कुबेरची पूजा करणे खूप चांगले आणि शुभ मानले जाते. घरातील कुबेर यंत्राजवळ दररोज दिवा लावावा आणि प्रसन्न मनानी त्याची पूजा करावी. याशिवाय नविन घर बांधताना कुबेरची दिशा लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला कुबेर देवाचा आशिर्वाद मिळण्यास मदत होते. घर बांधताना ईशान्य दिशेला कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करावी.
घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुम्ही ‘या’ नियमांचे पालन करा….
1) घराच्या पायऱ्या ईशान्य दिशेला कधिच बांधू नयेत. या दिशेला पायऱ्या बांधल्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतील. 2) ईशान्य दिशेला चप्पल आणि कचरा ठेवू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात वास राहात नाही. 3) बाथरूम ईशान्य दिशेला बांधू नये. असे केल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. 4) पैसे नेहमी उत्तरेकडे ठेवावेत. असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. 5) घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. जर ते घाणेरडे असेल तर घरात लक्ष्मी राहणार नाही. 6) दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या मंदिरात आणि तुळशी जवळ एक दिवा लावावा.
वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल त्यासोबतच संपत्तीमध्ये आणि आर्थिक वाढ होते. खरतरर, वास्तु उपाय हे फक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आपण आपले कठोर परिश्रम आणि प्रयत्न एकत्रित करून निकाल मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, वास्तुच्या नियमांचे पालन करून आणि कठोर परिश्रम करून, आर्थिक समृद्धी मिळवता येते आणि वाईट काळापासून मुक्तता मिळू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)