सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टींकडे पाहू नका, संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो!

सकाळी उठल्यानंतर 'या' गोष्टींकडे पाहू नका, संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो!
सकाळी उठल्यावर हे काम करू नका

धर्मग्रंथात सकाळची वेळ अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले आहे. या वेळी आपण जी ऊर्जा साठवतो ती दिवसभर आपल्यासोबत असते आणि तिच ऊर्जा आपल्याला दिवसभराचे काम करण्यासाठी मदत करते. जे लोक सकाळी उठून पूजा, व्यायाम, आंघोळ किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या शरीरात दिवसभर ऊर्जा भरलेली राहते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 3:12 PM

मुंबई : धर्मग्रंथात सकाळची वेळ अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले आहे. या वेळी आपण जी ऊर्जा (Energy) साठवतो ती दिवसभर आपल्यासोबत असते आणि तिच ऊर्जा आपल्याला दिवसभराचे काम करण्यासाठी मदत करते. जे लोक सकाळी उठून पूजा, व्यायाम, आंघोळ किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या शरीरात दिवसभर ऊर्जा भरलेली राहते. पण जर आपण सकाळी चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या गोष्टी दिसल्या तर त्याचा आपल्या मनावर चुकीचा परिणाम होतो.

अशा स्थितीत आपल्याला कोणत्याही कामात बरे वाटत नाही. कधी विनाकारण वादात वेळ जातो तर कधी पूर्ण दिवस खराब जातो. म्हणूनच आपल्या धार्मिक शास्त्रात असे सांगितले आहे की, आपण सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्यावे. जेणेकरून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर काही काम कधीही करू नये. यामुळे तुम्ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करता आणि यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. हे नेमके कोणते काम आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊयात.

आरशात बघू नका

काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा पाहणे आवडते. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार असे करू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या विचारांवर दिसून येतो. काही वेळा यामुळे कामही बिघडते.

रात्रीची भांडी

वास्तूनुसार रात्रीच्या जेवणाची भांडी कधीही किचनमध्ये ठेवू नका. सकाळी उठल्याबरोबर त्या भांड्यांकडे पाहू नका. यामुळे तुमचा दिवस तणावपूर्ण जातो.

घड्याळ

घड्याळ नेहमीच चालू ठेवा. जर तुमच्या घरामधील घड्याळ बंद पडले असेल तर चुकूनही बंद पडलेल्या घड्याळ्याकडे पाहू नका. सुई किंवा धागा पाहू नये. यामुळे तुमचे कोणाशी भांडण होऊ शकतात किंवा काही कारणाने तुमचा दिवस खराब होऊ शकतो.

प्राण्यांचे फोटो

काही लोक घरात प्राण्यांचे फोटो लावतात, सकाळी उठल्यावर ते दिसायला नकोत. यामुळे तुमचा दिवस वादामध्ये जाऊ शकतो. तुमच्या खोलीत कोणत्याही प्राण्याचे फोटो लावू नका.

काय करायचं

तुम्ही सकाळी तुमच्या तळहाताकडे पहावे. कारण त्यात तुमचे नशीब दडलेले असते. आपल्या तळहातावर नजर टाकून ‘कराग्रे वसते लक्ष्मी: कर्मधे सरस्वती, करमुले तू गोविंदः प्रभाते कर्तृत्वम्’ म्हणावे आणि मनातल्या मनात परमेश्वराचे स्मरण करा.

संबंधित बातम्या : 

Varad chaturthi 2022 : गणपतीला प्रसन्न करण्यासाठी वरद चतुर्थीला व्रत ठेवा, जाणून घ्या तिथी आणि शुभ वेळ!

Zodiac | ‘कुशाग्र बुद्धी’ , कोणतेही काम झटपट शिकतात या 4 राशींच्या व्यक्ती, तुमची रास यामध्ये आहे का?

 

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें