Chandra Grahan : 100 वर्षानंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण; काय असेल खास?
उद्या 25 मार्च रोजी देशभरात होळी साजरी होणार आहे. रंगामध्ये अनेकजण रंगून जातील. नात्याची बंध जुळणारा हा सण आहे. उद्या जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण असणार आहे. यंदा होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण होणार आहे. तब्बल 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण होत आहे. हा योगायोग आहे. उद्याच्या दिवशी चंद्राची छाया होळीवर पडणार असल्याने उद्याचा दिवस खास असणार आहे.
यंदा तब्बल शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण लागणार आहे. शंभर वर्षानंतर आलेला हा योग आहे. त्यामुळे देशवासियांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे. दर वर्षी फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षात पौर्णिमेच्या रात्री होळी दहन केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी 25 मार्च रोजी होळीचा सण येत आहे. होळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण देशभरात मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एक ग्रह निश्चित काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतो. त्याचा प्रभाव मानव जीवन आणि पृथ्वीवर पडतो. वर्षाचं पहिलं चंद्र ग्रहण 25 मार्च रोजी लागणार आहे. पंचांगानुसार, यावेळी होळीवर चंद्र ग्रहणाची सावली पडणार आहे. या वर्षीचं चंद्र ग्रहण 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल. दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी चंद्र ग्रहण संपेल. अशावेळी या चंद्र ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींच्या जातकांवर पडणार आहे. पण यातील तीन राशी अशा आहेत की ज्यांचं भाग्य चमकणार आहे. कोणत्या आहेत या राशी? याचाच घेतलेला हा आढावा.
मोठी डील होणार
वृषभ राशीसाठी होळीच्या दिवशी होणारं चंद्र ग्रहण शुभ ठरणार आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना अधिकाऱ्यांची मदत मिळेल. व्यापारीवर्गासाठीही आनंदाची बातमी आहे. व्यापाऱ्यांची मोठी डील होईल. या राशीचे लोक कुटुंबासोबत मनातील भावना शेअर करतील. लव्ह लाइफमध्ये रोमांसचा तडका मिळेल. आरोग्य सुधार होईल.
भावाचं लग्न ठरल्याने…
तुळ राशीसाठीही होळीच्या दिवशी लागणारं चंद्र ग्रहण शुभ असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नोकरदारांना यश मिळेल. घरात मोठ्या भावाचं लग्न ठरल्याने पाहुण्यांची ये-जा सुरू राहील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने येईल.
वसुली होईल
मकर राशीच्या लोकांना 2024चं चंद्र ग्रहण अधिक लाभदायक राहणार आहे. नोकरी-व्यवसाय पुढे नेण्यासाठी संधी मिळेल. उधारी वसूल होईल. मुलांकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. जीवनसाथीकडून गुड न्यूज येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)