AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi : गणराय येती घरा.. पूजेसाठी आज तयार ठेवा सगळं सामान, ही लिस्ट एकदा चेक कराच

Ganesh Chaturthi 2025 Pujan Samigiri List : घरोघरी गणेशोत्सवाचा उत्साह असून आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघेल काहीच तास उरले आहेत. उद्या म्हणजेच 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून गणरायाचा हा उत्सव 11 दिवस चालेल. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा घरोघरी होईल. आरास, सजावट सगळी तयारी झाली असेलच पण उद्या पहाटे लवकर पूजा करण्यापूर्वी पूजेचं सगळं सामान आलंय ना, तयारी झाली ना ते चेक करा. ही घ्या संपूर्ण सामानाची लिस्ट

Ganesh Chaturthi : गणराय येती घरा..  पूजेसाठी आज तयार ठेवा सगळं सामान, ही लिस्ट एकदा चेक कराच
गणपती बाप्पा मोरयाImage Credit source: social media
| Updated on: Aug 26, 2025 | 3:02 PM
Share

उद्या, म्हणजेच 27 ऑगस्टला ग दिवस काही ठिकाणी णेश चतुर्थी असून घरोघरी गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे. काही ठिकाणी आज म्हणजेच आदल्या दिवशी गणराय आणतात तर काही घरी उद्या सकाळीच गणपतीचे आगमन होते. 6 सप्टेंबरपर्यंत गणेशउत्सव असून काही घरात दीड दिवस काहीव ठिकाणी 5 तर काही घरात गौरी-गणपती असतात. काही मोजक्या घरात मात्र तब्बल 10 दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत गणराय विरामान असतात.

गणेश चतुर्थीच्या दिवशी, उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून, घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. मोदकांचा सुवास दरवळत असतो, आरतीच्या, घंटेच्या, टाळ्यांच्या गजरात घर दुमदुमत असतं. गणपती बाप्पाची पूजा केल्यान विद्या तर मिळतेच पण सर्व विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं. पण बाप्पाची पूजा करण्यापूर्वी सर्व तयारी नीट झाली आहे ना, पूजेसाठी सगळं सामान नीट आणलंय ना ते चेक करा.

खाली दिलेली लिस्ट तपासून बघा आणि तुमच्याकडे काही आणायचं असेल तर आत्ताच आणून घ्या. गणरायाचे जोरदार स्वागत करा. म्हणा.. गणपती बाप्पा मोरया !

गणेश चतुर्थी पूजन साहित्य

1) गणपती बाप्पाची मूर्ती

2) कलश

3) नारळ / श्रीफळ

4) सुपारी

5) आंब्याची पान, आंब्यांचे डहाळे

6) ताम्हन

7) अक्षता

8) दूर्वा (21,11 किंवा कमीत कमी 7 )

9) मोदक

10) फुलं

11) धूप,

12) निरांजन, समई

13) गायीचं तूप किंवा दिव्यासाठी तेल

14) कापूर

15) पूजेसाठी वस्त्र

16) गणरायाचे वस्त्र

17) विड्याची पानं

18) फुलांच्या माळा

19) नाणी, नोटा

20) गुलाबजल

21) जानवं

22) पंचखाद्य

23) 5 प्रकारची वेगवेगळी फळं

24) प्रसाद

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र का पाहू नये ? ही गोष्ट माहीत आहे का ?

गणरायाच्या 21 नावांचाह करू शकता जप

गणरायाची प्राणप्रतिष्ठा, स्थापना झाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गणपती बाप्पाच्या 21 नावांचा जपही करू शकता.

ओम गणराय नमः, ओम गं गणपतये नमः , ओम गं हेरम्बाय नमः, ओम गं क्षिप्रप्रसादनाय नमः, ओम गं महागणपतये नमः, ओम गं चिंतामणये नमः, ओम गं मंत्राय नमः, ओम गं काश्यपाय नमः, ओम गं आशापूरकाय नमः, ओम गं धरणीधराय नमः, ओम गं लक्षप्रदाय नमः ,ओम गं नन्दनाय नमः, ओम गं वाचासिद्धाय नमः, ओम गं सुमङ्गलाय नमः, ओम गं शिवाय नमः, ओम गं ढुण्ढिविनायकाय नमः ,ओम गं वरदाय नमः, ओम गं अमृताय नमः , ओम गं बीजाय नमः, ओम गं अमोघसिद्धये नमः, ओम गं निधये नमः

गणपतीच्या या 21 नावांचा जप केल्याने मनुष्याला आंतरिक शांती मिळते. तसेच, गणपतीच्या या नावांचा जप केल्याने त्या व्यक्तीला बुद्धी आणि समृद्धी मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.