Black Moon : आज रात्री आकाशात ‘ब्लॅक मून’चे दर्शन घ्या; ‘ब्लॅक मून’सोबत सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग

पौर्णिमेला ‘ब्लू मून’ म्हणतात. ब्लॅक मून ही ब्लू मूनची दुसरी बाजू आहे. अंशतः काळ्या चंद्रामुळे, दक्षिणपूर्व पॅसिफिक आणि दक्षिण अमेरिकेत हे आंशिक सूर्यग्रहण होईल. नासाच्या म्हणण्यानुसार, या सूर्यग्रहण काळात सूर्याच्या डिस्कचा सुमारे 64% भाग लपविला जाईल. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधे येतो, त्यावेळी हे सूर्यग्रहण होते.

Black Moon : आज रात्री आकाशात 'ब्लॅक मून'चे दर्शन घ्या; 'ब्लॅक मून'सोबत सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग
आज रात्री आकाशात 'ब्लॅक मून'चे दर्शन घ्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 7:42 PM

मुंबई : खगोलप्रेमींसाठी आज रात्री मोठी पर्वणी आहे. आकाशात ‘ब्लॅक मून‘ (Black Moon) सोबत सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग जुळून येणार आहे. नव्या वर्षातील हे पहिले आंशिक सूर्यग्रहण (Eclipse) असेल. शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ खगोलीय घटनेला ‘ब्लॅक मून’ म्हटले आहे. चंद्राला प्रकाश मिळत नाही तेव्हा ही खगोलीय दुर्मिळ घटना घडते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. आंशिक सूर्यग्रहण फक्त या ब्लॅक मूनमधून होईल. अंटार्क्टिका, अटलांटिक प्रदेश, पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून हे सूर्यग्रहण दिसू शकते. भारतीय वेळेनुसार, आज रात्री 12.15 मिनिटांनी हे आंशिक सूर्यग्रहण सुरू होईल आणि पहाटे 4.07 मिनिटांपर्यंत चालेल. (Good news for astronomers, Black Moon will appear in the sky tonight)

भारतात दिसणार नाही सूर्यग्रहण

पौर्णिमेला ‘ब्लू मून’ म्हणतात. ब्लॅक मून ही ब्लू मूनची दुसरी बाजू आहे. अंशतः काळ्या चंद्रामुळे, दक्षिणपूर्व पॅसिफिक आणि दक्षिण अमेरिकेत हे आंशिक सूर्यग्रहण होईल. नासाच्या म्हणण्यानुसार, या सूर्यग्रहण काळात सूर्याच्या डिस्कचा सुमारे 64% भाग लपविला जाईल. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधे येतो, त्यावेळी हे सूर्यग्रहण होते. परिणामी, पृथ्वीवर सावली पडते. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. जे नागरिक, खगोलप्रेमी या दुर्मिळ खगोलीय घटनेचा नजराणा पाहण्यासाठी उत्सुक आहेत, ते थेट युट्यूब चॅनेलद्वारे लाईव्ह प्रसारणाचा आनंद घेऊ शकतील. Timeanddate Live हे YouTube चॅनल आज रात्री 11.15 वाजता सूर्यग्रहणाचे प्रसारण सुरू करणार आहे. खगोलप्रेमींना दुर्मिळ खगोलीय योग लाईव्ह नजरेत साठवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

25 ऑक्टोबरला दुसरे आंशिक सूर्यग्रहण

या वर्षी दोन सूर्यग्रहणाचा योग आहे. दुसरे आंशिक सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला होणार आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ते सूर्यग्रहण युरोप, ईशान्य आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामधून दिसणार आहे. त्यावेळीही पूर्ण सूर्यग्रहण होणार नाही. ब्लॅक मून या आंशिक सूर्यग्रहणासोबतच आज रात्री दुसरा योगही जुळून येणार आहे. तो योग म्हणजे, आज तुम्ही शुक्र आणि गुरू ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे पाहू शकाल. इतके जवळ येणार आहेत की ते एकमेकांना भिडणार आहेत, अशी शंका तुमच्या मनात डोकावू शकते. (Good news for astronomers, Black Moon will appear in the sky tonight)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.