Gudi Padwa 2024 : नेसून साडी, माळून गजरा… मित्र, मैत्रिणींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा…

मराठी माणसाचा हक्काचा सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कॅलेंडरनुसार गुढीपाडव्याच्या दिवसापासून मराठी नवीन वर्ष सुरू होतं. उद्या म्हणजे 9 एप्रिल रोजी यंदा गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. घरावर गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. तसेच या दिवशी शोभायात्रा काढल्या जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. अन् हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

Gudi Padwa 2024 : नेसून साडी, माळून गजरा... मित्र, मैत्रिणींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा...
मित्र, मैत्रिणींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 9:29 AM

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात उद्या 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. यादिवशी हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात होते. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्येही हा उत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. काही ठिकाणी उगादी, काही ठिकाणी युगादी आणि काही ठिकाणी चेती चंद नावानेही हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घरावर गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं.

गुढी या शब्दाचा अर्थ ध्वज किंवा प्रतीतक असा आहे. पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी बांबूची काठी, कापड आणि तांब्याचे किंवा चांदीचे भांडे वर ठेवलेल्या गुढी घरावर उभारल्या जातात. गुढी कडुलिंबाची पाने, फुले आणि आंब्याच्या पानांनी सजवली जाते. या दिवशी शहरा शहरातून शोभायात्रा काढल्या जातात. जल्लोष केला जातो. तसेच गोडधोड बनवून हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी सर्वजण आपल्या नातेवाईक आणि प्रियजणांना शुभेच्छा देतात. तुम्हालाही तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि आप्तेष्टांना खालील शुभेच्छा देऊन तुमचा दिवस आनंदात घालवू शकता.

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

————–

वसंताची चाहूल घेऊन आलं नववर्ष

मना-मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरणी वाहू…

स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

———————

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी…

नवे नवे वर्ष आले,

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…

————————

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

———————–

गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

———————

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन…

नूतनवर्षाभिनंदन !!

———————–

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

———————–

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी,

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे,

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे,

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

———————

गुढीपाडव्याची गोड चव तुमचे जीवन,

गोड आणि आनंदाने भरून जावो,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.