Holi Bhai Dooj 2021 | आज आहे होळी भाऊबीज, जाणून घ्या या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण का करावं?

आज होळी भाऊबीज (Holi Bhai Dooj 2021) आहे. हा उत्सव देशाच्या काही भागात साजरा केला जातो.

Holi Bhai Dooj 2021 | आज आहे होळी भाऊबीज, जाणून घ्या या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण का करावं?
bhai dooj

मुंबई : आज होळी भाऊबीज (Holi Bhai Dooj 2021) आहे. हा उत्सव देशाच्या काही भागात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या दुसर्‍या दिवशी होळी भाऊबीज साजरी केली जाते. या तारखेला भ्रातृ द्वितीया म्हणून देखील ओळखले जाते. यावर्षी, होळी भाऊबीज आज म्हणजेच 30 मार्च 2021 रोजी आहे (Holi Bhai Dooj 2021 Know The Importance Of This Ritual).

या दिवशी बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीजला औक्षण करण्याची परंपरा आहे. चला जाणून घेऊया होळी भाऊबीजच्या शुभ मुहूर्ताबद्दल आणि महत्त्व

होळी भाऊबीज शुभ मुहूर्त

द्वितीया तिथी – 29 मार्च 2021 ला सायंकाळी 8 वाजून 54 मिनिट ते 30 मार्च 2021 ला सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांपर्यंत

होळी भाऊबीजेचं महत्त्व

दीवाळीला ज्या प्रकारे बहीण भावाचं औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते त्याचप्रकारे होळीच्या दुसऱ्या दिवशी टिळा लावून होळी भाऊबीजचा सण साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये मान्यता आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी औक्षण करुन त्यांना सर्व संकटांपासून वाचवलं जाऊ शकतं.

पौराणिक कथा काय?

एका गावात एक वृद्ध महिला राहात होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. वृद्ध महिलेने तिच्या मुलीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर एक दिवस वृद्धेच्या मुलाने होळीनंतर बहिणीला औक्षण करण्याची विनंती केली. वृद्धेने यासाठी मुलाला परवानगी दिली. मुलगा जंगलातून जात असताना वाटेत त्याला एक नदी दिसली. नदी म्हणाली, मी तुझी वेळ आहे, मी तुला गिळंकृत करेन. मुलगा म्हणाला, आधी मी माझ्या बहिणीकडून टिळा लावून येतो, मग तू माझा जीव घेऊ शकतेस.

यानंतर वाटेत त्याला एक सिंह भेटतो तेव्हा देखील तो सिंहाला असंच सांगतो. त्यानंतर वाटेत त्याला एक साप भेटला. तो त्या सापालाही असेच म्हणाला. काही वेळाने तो आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतो. बहिणीने टिळा केल्यानंतर तो दु: खी मनाने तेथून निघतो, त्यामुळे बहिण त्याला काय झालं असं विचारते. त्यानंतर तो बहिणीला सर्व सांगते.

यानंतर बहीण म्हणते, थांब मी देखील तुझ्यासोबत येते. बहीण तलावाजवळ येते तेव्हा तिला तिथे एक वृद्ध महिला भेटते. इथे ती त्या वृद्ध महिलेला तिची समस्या सांगते. तेव्हा ती वृद्ध महिला सांगते की हे तुझ्या भावाच्या पूर्वीच्या जन्माचे फळ तो सध्या भोगत आहे. त्याचे लग्न होईपर्यंत जर तू त्याला वाचवू शकली तर तो जिवंत राहील.

त्यानंतर बहिणीने आपल्यासोबत मांस, दूध आणि ओढणी ठेवली. दोघं घराच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा वाटेत त्यांना तो सिंह भेटला. तेव्हा बहिणीने त्याच्यापुढे मांसाचा तुकडा ठेवला आणि तो ते मांस खाण्यात मग्न झाला. पुढे त्यांना साप भेटला तर बहिणीने त्याच्यापुढे दूध ठेवलं. काही काळाने त्यांना नदी भेटली, तेव्हा बहिणीने लाल ओढणी समर्पित करुन तिला नमन केलं. याप्रकारे बहीण भावाचा जीव वाचवते.

मान्यता आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊ जर बहिणीकडून टिळा करवून घेतो तर त्याचे सर्व कष्ट आणि दु:ख दूर होतात.

Holi Bhai Dooj 2021 Know The Importance Of This Ritual

संबंधित बातम्या :

भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना “नो एन्ट्री”, जाणून घ्या यामागील कारण…

Chaitra Maas 2021 : ‘चैत्र’ महिन्यात गोड पदार्थांचं सेवन करु नये, जाणून घ्या यामागील कारण….