AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ शहरात पहिल्यांदा खेळली गेली होळी, जाणून घ्या होळीच्या इतिहासाबद्दल

Holi Origin History : होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. यंदा मार्च महिन्यातच होळी आलीये. आता अवघे काही दिवसच होळीच्या सणाला शिल्लक आहेत. होळीचा एका मोठा इतिहास आहे, चला तर जाणून घ्या होळीचा इतिहास

'या' शहरात पहिल्यांदा खेळली गेली होळी, जाणून घ्या होळीच्या इतिहासाबद्दल
Holi
| Updated on: Mar 23, 2024 | 1:27 PM
Share

मुंबई : संपूर्ण देशामध्ये होळीची जोरदार तयारी बघायला मिळते. होळी म्हटले की, उत्साह, मस्ती आणि एक वेगळाच जल्लोष बघायला मिळतो. जवळपास लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा सण आवडतो. रंगांची उधळण या सणामध्ये केली जाते. प्रत्येक राज्यात आपआपल्या परंपरांनुसार हा सण साजरा केला जातो. होळीच्या संबंधित अनेक कथा या आपल्याला कायमच ऐकायला मिळतात. होळी म्हटले की, भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचा रंग मिसळतो. होळीच्या जवळपास सर्व कथा या भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या असतात. होळीचा एक मोठा इतिहास नक्कीच आहे. चला जाणून घेऊयात होळीच्या इतिहासाबद्दल.

हिरणाकश्यपचा वध करण्यात आला. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलाल उधळण्याची परंपरा सुरू झाली. होलिका दहन झाशीच्या एरच शहरात पहिल्यांदा झाल्याचे सांगितले जाते. होळीची सुरूवात ही झाशीमधून झालीये. झाशीच्या डिकौली पर्वत रागांमध्ये ही जागा आजही अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.

या नगरीला लोक प्रल्हादांची नगरी असे देखील म्हणतात. झांशी शहरापासून एरच 70 किलोमीटर अंतरावर आहे. फक्त बुंदेलखंडमध्येच नाही तर संपूर्ण देशात होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू आहे. आजही एरचमध्ये लोक आनंदाने शहरात मिरवणूक काढून ही परंपरा साजरी करतात. दुसरे दिवशी होळी खेळली जाते.

होळी म्हटले की, मधुरा आणि वृंदावनची आठवण आपल्या सर्वांना होते. आजही मधुरा आणि वृंदावनच्या होळीबद्दल लोकांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळते. मधुरा आणि वृंदावनमध्ये आठ दिवस होळी सुरू असते. मधुरा आणि वृंदावनमध्ये खास होळी खेळण्यासाठी अनेक लोक दाखल होतात, यादरम्यान मोठी गर्दी मधुरा आणि वृंदावनमध्ये होते.

एका अनोख्या भावनेने मधुरा आणि वृंदावनमध्ये होळी साजरी करण्याची परंपरा आहे. देशातील इतरही शहरांमध्ये जोरदार पद्धतीने होळी ही साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सकाळपासूनच लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळते. फुले, रंगांची उधळण यादिवशी केली जाते. होळीच्या जणाला एक मोठे महत्व नक्कीच आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.