Chanakya Niti : घरात ‘या’ गोष्टी घडत असतील तर आचार्य चाणक्य म्हणतात समजून जा वाईट काळ सुरू झाला

आदर्शन जीवन कसे असावे याबाबत आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांत लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जर तुमच्या आयुष्यात नियमित घडत असतील तर तुमचा वाईट काळ सुरू झाला आहे असे समजावे असे चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti : घरात 'या' गोष्टी घडत असतील तर आचार्य चाणक्य म्हणतात समजून जा वाईट काळ सुरू झाला
आचार्य चाणक्य
Image Credit source: Tv9
अजय देशपांडे

|

May 09, 2022 | 8:03 AM

आदर्श जीवन कसे असावे याबाबत आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी लिहिलेला चाणक्य निती (Chanakya niti) हा ग्रंथ म्हणजे आदर्श जीवनाचा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. आचार्य चाणक्य यांनी जेव्हा या गोष्टी सांगितल्या होत्या तेव्हा समाज व्यवस्था (Social system) वेगळी होती, लोकांच्या गरजा वेगळ्या होत्या. आता समाज रचनेमध्ये मोठा बदल झाला आहे. व्यक्तींच्या गरजा बदलल्या आहेत. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी त्याकाळात सांगितलेल्या सर्वच गोष्टी आज लागू होतीलच असे नाही. मात्र आजही त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी या काळाच्या सुसंगत आहेत. आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या अनेक समस्यांची उत्तरे आपल्या चाणक्य निती या ग्रंथात दिली आहेत. मनुष्याचा वाईट काळ कधी सुरू होतो, याबाब आचार्य चाणक्य यांनी चार गोष्टी सांगितल्या आहेत. या घटना तुमच्यासोबत घडत असतील तर समजून घ्यावे तुमचा वाईट काळ सुरू झाला आहे, असे आचार्य चाणक्य सांगतात. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत पाहुयात

  1. तुळस सुखने : हिंदू धर्मामध्ये तुळसीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळसीच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र माणण्यात येते. मात्र जर तुळसीचे रोप अचानक वाळले तर घरात काहीतरी अघटीत घटना घडणार आहे अस समजावे असे चाणक्य म्हणतात.
  2. घरात दररोज भांडणं होणे : आचार्य चाणक्य म्हणतात ज्या घरात दररोज भांडणे होतात, त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. असे घर नेहमी अशांत राहाते. घरात पैशांची कमतरता जाणवते.
  3. मोठ्यांचा अपमान करणे : आचार्य चाणक्य म्हणतात ज्या घरात मोठ्यांचा अपमान केला जातो, त्या घरात कधीच लक्ष्मी टीकत नाही. ज्या घरात थोरा-मोठ्यांचा सन्मान होत नाही, तिथे येणाऱ्या काळात मोठे संकट येणार आहे असे समजावे असे चाणक्य यांनी म्हटले आहे.
  4. दररोज देवाची पूजा न करणे : आचार्य चाणक्य सांगतात की, दररोज देवाची पूजा करावी, पूजा केल्याने मन प्रसन्न राहाते. मात्र ज्या घरात नियमित देवाची पूजा होत नाही, त्या घरावर अनेक संकटे येतात. घरातील लोकांना कोणत्याच कामात यश येत नाही. त्यामुळे दररोज न चुकता पूजा करण्याचा सल्ला आर्य चाणक्य देतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें