Janaki Jayanti 2021 : या दिवशी करा माता सीतेची पूजा, खूप चांगले आहेत फायदे

जानकी जयंती उद्या म्हणजेच 6 मार्च रोजी आहेत. हे सीता अष्टमी आणि सीता जयंती या नावाने देखील ओळखले जाते.

Janaki Jayanti 2021 : या दिवशी करा माता सीतेची पूजा, खूप चांगले आहेत फायदे

मुंबई : फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तारखेला आई सीता प्रकट झाल्या होत्या. म्हणून हा दिवस जानकी जयंती म्हणून साजरा केला जातो. यावेळी जानकी जयंती उद्या म्हणजेच 6 मार्च रोजी आहेत. हे सीता अष्टमी आणि सीता जयंती या नावाने देखील ओळखले जाते. (janaki jayanti 2021 date shubh muhurat vrat puja vidhi upay importance significance)

सीता माता आणि राम जी यांना आदर्श पती आणि पत्नी मानले जाते, म्हणून हा दिवस सुहागिन महिला आणि कुमारी मुलींसाठी खूप महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की जर सौभ्यागवती स्त्रिया या दिवशी व्रत ठेवतात आणि सीता माता आणि श्री राम यांना आदरपूर्वक उपासना करतात. यामुळे तुमच्या वैवाहिक समस्या दूर होतात आणि नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळतं.

कुमारी मुलींना चांगला वर मिळेल…

कुमारी मुलींच्या विवाहाचा प्रश्न असेल तर त्यांना रामासारखा योग्य वर मिळेल. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व तीर्थक्षेत्रे पाहण्याचे योग येतात.

शुभ मुहूर्त

अष्टमी तिथिचा प्रारंभ : 05 मार्च संध्याकाळी 07 वाजता 54 मिनिटवर

व्रत आणि पुजेचा दिवस : 06 मार्च 2021

अष्टमी तिथि समाप्त : 06 मार्च शनिवारला संध्याकाळी 06 वाजचा 10 मिनिटवर

व्रत आणि उपासना करण्याची पद्धत

6 मार्चच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पूजास्थळावर जाऊन आधी माता सीता आणि भगवान श्री राम यांना नमन करा आणि त्यांचा उपवास करा. यानंतर आधी गणपतीचं ध्यान करा आणि उपवास व प्रार्थना करा. यानंतर माता सीतेची आणि रामाची पूजा करावी. त्यांना चंदन, पिवळी फुले, कपडे आणि लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार आई सीतेला द्या. धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर कथा वाचून आरती करावी. दिवसभर उपवास ठेवा. (janaki jayanti 2021 date shubh muhurat vrat puja vidhi upay importance significance)

संबंधित – 

Amalaki Ekadashi 2021 | भगवान विष्णूच्या पूजेचा दिन ‘आमलकी  एकादशी’, वाचा या व्रताची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? जाणून घ्या…

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीचे व्रत करताय? भगवान शंकराला चुकूनही ‘या’ पाच गोष्टी अर्पण करु नका

(janaki jayanti 2021 date shubh muhurat vrat puja vidhi upay importance significance)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI