AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीचे व्रत करताय? भगवान शंकराला चुकूनही ‘या’ पाच गोष्टी अर्पण करु नका

भगवान शंकराची पूजा केला जाणारा महापर्व महाशिवरात्री काहीच दिवसांवर आला आहे (Mahashivratri 2021).

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीचे व्रत करताय? भगवान शंकराला चुकूनही 'या' पाच गोष्टी अर्पण करु नका
Mahashivratri
| Updated on: Mar 03, 2021 | 9:41 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात सणांचं फार महत्त्व आहे. या महिन्यात दोन मोठे सण आहेत होळी आणि महाशिवरात्री (Mahashivratri 2021). भगवान शंकराची पूजा केला जाणारा महापर्व महाशिवरात्री काहीच दिवसांवर आला आहे. महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शिवचा (Mahashivratri 2021) विवाह माता पार्वतीसोबत झाला होता. शिवरात्रीवर भगवान शिवची विधिवत रुपात पूजा-अर्चना केली जाते (Mahashivratri 2021 Celebrated On 11th March Do Not Worship These 5 Things To Lord Shiva).

या दिवशी भगवान शंकराची वरात काढली जाते. या वर्षी महाशिवरात्री 11 मार्च 2021 गुरुवारच्या दिवशी येत आगे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास ठेवल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

भगवान शंकराला चुकूनही या 5 गोष्टी अर्पण करु नये

तुळस

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवला चुकूनही तुळस वाहू नये. तसे तर प्रत्येक प्रकारच्या पूजत तुळसचा वापर केला जातो. तुळसचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पण, तुळस भगवान शंकराला वर्ज्य आहे. भगवान शंकराला पूजेत फक्त बेलपत्र वाहिले जाते. तुळशी देवीचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे म्हणून शंकराला तुळस वाहिली जात नाही.

तुटलेल्या अक्षता

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करत असाल कर तुटलेल्या अक्षता वाहू नये. तुटलेले तांदूळ वाहणे पूर्णपणे अपूर्ण आणि अशुद्ध असते. त्यामुळे भगवान शंकराला हे वाहिले जात नाही.

शंख

महाशिवरात्रीच्या दिवशी शिव उपासनेत शंखाचा वापर करणे वर्जित मानलं जातं. याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता जो भगवान विष्णूचा भक्त होता. शंखाला असूरचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शंकराच्या पूजेत शंखाचा वापर केला जात नाही (Mahashivratri 2021).

कुंकू

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला कुंकू वाहिलं जात नाही. कुंकू सौभाग्याचं प्रतीक असतं. जेव्हाकी भगवान शंकर वैरागी आहेत. त्यामुळे शंकरजींना कुंकू वाहिलं जात नाही. तसेच, शिवलिंगवर हळदही चढवली जात नाही.

नारळ पाण्याने अभिषेक करु नये

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या आराधनेवेळी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करु नये. नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, ज्यांचा संबंध भगवान विष्णूसोबत आहे. त्यामुळे शंकराला नारळ पाण्याने अभिषेक केला जात नाही.

Mahashivratri 2021 Celebrated On 11th March Do Not Worship These 5 Things To Lord Shiva

संबंधित बातम्या :

Janaki Jayanti 2021 | माता सीतेचा प्रकट दिन अर्थात ‘जानकी जयंती’, घरातील कन्येच्या विवाहासाठी करा ‘हे’ उपाय!

Angarki Sankashti Chaturthi 2021 | ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? वाचा यामागची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.