AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaal Bhairav Jayanti 2024: 22 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती, जाणून घ्या पूजेचं महत्त्व आणि जन्म कथा

कालभैरवाच्या पूजेला हिंदू शास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. कालभैरव हा शिव अवतार असून क्रोध, शक्ति आणि न्यायाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. 22 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे.

Kaal Bhairav Jayanti 2024: 22 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती, जाणून घ्या पूजेचं महत्त्व आणि जन्म कथा
| Updated on: Nov 21, 2024 | 5:55 PM
Share

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यंदा कालभैरव जयंती 22 नोव्हेंबरला आली आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी सुरु होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 22 नोव्हेंबरला शुक्रवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल. कालभैरवाना पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं. कालभैरवाच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्त्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे. कालभैरवाच्या रुपाकडे क्रोध, शक्ति आणि न्यायाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. याबाबत एक कथा सांगितली गेली आहे.

एकदा ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण? यावरून वाद झाला. सर्व देवता यात सहभागी झाले होते. तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीचा रचियेता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता. तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला. पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला. भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रुप धारण केलं. या रुपाला कालभैरव असं पुजलं गेलं.

कालभैरवाच्या हातात त्रिशुळ, कमंडलु होतं तसेच गळ्यात नरमुंडची माळ होती. त्यांची उत्पत्ति ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती.कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवं मुख कापलं. कारण ते अहंकाराचं प्रतिक होतं. त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबुल केली आणि क्षमा मागितली. पण ब्रह्मदेवांचं शिर कापल्याने पाप लागलं होतं. प्रायश्चित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले. यामुळेच काशीला मुक्ती स्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधलं जातं.

कालभैरवाची पूजा कशी कराल?

पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेसाठी तयारी करा. कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो. भगवान शंकर आणि कालभैरवाचं छबीसमोर दिवा लावा. मध्यरात्री धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवा. तसेच जिलेबी किंवा इमारतीचा नैवेद्य दाखवावा. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा आणि आरती करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि काळ्या कुत्र्‍याला भोजन द्या. काळा कुत्रा हा कालभैरवाचं वाहन असल्याने लाभ मिळतो. त्यानंतर 108 वेळा ओम कालभैरवाय नम: या मंत्राचा जप करा.

..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.