Kalashtami 2021 | कालाष्टमी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

हिंदू धर्मात पूजा आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे (Kalashtami 2021). प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. यावेळी कलाष्टमी 3 मे 2021 रोजी आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:22 PM, 2 May 2021
Kalashtami 2021 | कालाष्टमी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
Kaalbhairava

मुंबई : हिंदू धर्मात पूजा आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे (Kalashtami 2021). प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. यावेळी कलाष्टमी 3 मे 2021 रोजी आहे. या दिवशी भगवान शंकराच्या रुद्ररुप भगवान कालभैरवाची पूजा केली जाते. काळभैरवाच्या सौम्य स्वरुपाला बटुक म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी भक्त बटुक रुपाची पूजा करतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यांच्या कृपेने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. चला कालाष्टमीशी संबंधित गोष्टींबद्दल जाणून घेऊया (Kalashtami 2021 Know The Tithi Puja Vidhi And Importance).

कालाष्टमीचा शुभ काळ

अष्टमी तिथी सुरु – 3 मे 2021 दुपारी 1 वाजून 39 मिनिटांपासून

अष्टमी तिथी समाप्त – 4 मे 2021 दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत

कालाष्टमी पूजा पद्धत

कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र घालावे

यानंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी

त्यानंतर गंगेचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करुन घ्या

आता त्यांना फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करा

भगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावा

यानंतर भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करा

आरती करुन पूजा संपन्न करा

कालाष्टमीचे महत्त्व

अष्टमी तिथीला कालाष्टमी उपवास ठेवला जाईल. श्रद्धेनुसार, जो कालभैरवाच्या भक्तांशी वाईट वागतो, त्याला तिन्ही लोकात आश्रय मिळत नाही. या दिवशी जो कोणी कालभैरवाची खरी भक्तिभावाने उपासना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी उपासना केल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. भक्त भगवान कालभैरवच्या बटुक रुपाची पूजा करतात कारण तेच त्यांचे सौम्य रुप आहे. भगवान कालभैरव हे रौद्र स्वरुपाचे आहेत. परंतु ते आपल्या भक्तांसाठी दयाळू आणि परोपकारी आहेत.

उपाय

भक्त या दिवशी भगवान भैरव म्हणून कुत्र्याची पूजा करतात. कलाष्टमीला कुत्र्याला गोड पोळी किंवा कच्चे दूध द्यावे. याशिवाय, रात्रीच्या वेळी मोहरी, तीळ, उडीद, काळी तीळ आणि दिवा इत्यादीने भैरवची पूजा करावी.

Kalashtami 2021 Know The Tithi Puja Vidhi And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

पूजेमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘या’ 4 गोष्टी कधीही शिळ्या होत नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

Lord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती