Kartik Purnima 2023 : या तारखेली आहे कार्तिक पौर्णिमा, भगवान विष्णूंचा आशिर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी अवश्य करा

Kartik Purnima धार्मिक मान्यतांनुसार, पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात. तसेच या तिथीला गरीब आणि गरजूंना दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच या दिवशी घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कार्तिक पौर्णिमा नेमकी किती तारखेला आहे ते जाणून घेऊया.

Kartik Purnima 2023 : या तारखेली आहे कार्तिक पौर्णिमा, भगवान विष्णूंचा आशिर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी अवश्य करा
कार्तिक पौर्णिमाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 5:01 PM

मुंबई : पौर्णिमा तिथी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे. काही भक्त या विशेष दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून कार्तिक महिना सुरू झाला, जो भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत जोतिषी पराग कुळकर्णी यांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा (Kartik Purnima 2023) कधी येत आहे आणि या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या बद्दल माहिती जाणून घेऊया.

कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची पौर्णिमा रविवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:53 वाजता सुरू होत आहे. त्याच वेळी, सोमवार, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:45 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल. अशा स्थितीत कार्तिक महिन्याची पौर्णिमा 27 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.

हे काम नक्कीच करा

धार्मिक मान्यतांनुसार, पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात. तसेच या तिथीला गरीब आणि गरजूंना दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच या दिवशी घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त संपूर्ण घराची योग्य प्रकारे स्वच्छता करतो त्याच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी दान करा

पौर्णिमा तिथीला तांदूळ, साखर, दूध इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान केल्यास साधकाला शुभ फळ मिळू शकते. हिंदू धर्मात दिवा दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, त्यामुळे या दिवशी संध्याकाळी दिवा दान करणे आवश्यक आहे. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये दिवे लावल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात असे मानले जाते.

या चुका करू नका

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. या दिवशी मांसाहार टाळा आणि सात्विक आहार घ्या. तसेच या दिवशी मद्यप्राशन करू नये. कार्तिक पौर्णिमेच्या विशेष प्रसंगी, एखाद्याने कोणाचाही अपमान, द्वेष आणि शिवीगाळ करू नये, यामुळे भगवान विष्णूंचा राग येऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.