Dreams | स्वप्नात ‘या’ पाच गोष्टी पाहणे शुभ मानलं जातं, यश आणि धन लाभ होण्याची शक्यता

आपण स्वप्नात नेहमी अशा गोष्टी पाहातो ज्या आपण आपल्या आयुष्यात (Meaning Of Dreams) मिळवू इच्छितात किंवा ज्या वस्तूंबाबत आपण विचार करतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:34 PM, 7 Apr 2021
Dreams | स्वप्नात 'या' पाच गोष्टी पाहणे शुभ मानलं जातं, यश आणि धन लाभ होण्याची शक्यता
झोप

मुंबई : आपण स्वप्नात नेहमी अशा गोष्टी पाहातो ज्या आपण आपल्या आयुष्यात (Meaning Of Dreams) मिळवू इच्छितात किंवा ज्या वस्तूंबाबत आपण विचार करतो. काही लोक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहातात. तर काही लोक उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहातात आणि आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी खूप परिश्रम करतात. नेहमी मोठी स्वप्न पाहावी असं म्हटलं जातं. जे लोक परिश्रम करतात त्यांची सर्व स्वप्न पूर्णही होतात (Know The Meaning Of Dreams That You Are Seeing Might Give You Some Good Sign About Future).

लोकांच्या मते बहुतेक स्वप्न हे बिनकामाचे असतात. पण, काही गोष्टी स्वप्नात पाहण्याचं एक विशेष कारण असतं. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. त्याचं भविष्यात घडणाऱ्या घटनांशी विशेष संबंध असतो. चला जाणूवन घेऊया स्वप्नात दिसणाऱ्या काही अशा गोष्टींबाबत जे पाहणे अत्यंत शुभ मानले जातात –

स्वप्नात पान खाणे

हिंदू धर्मात पानाला शुभ मानलं जातं. पूजा पाठ करतानाही देवी-देवतांना नैवेद्यातही पान ठेवलं जातं. पान लक्ष्मी आणि गणेशजी यांनाही प्रिय आहे. स्वप्नात पान खाण्याचा अर्थ आहे की तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. स्वप्नात पान खाणे शुभ संकेत आहे.

स्वत: घोड्यावर चढताना पाहणे

स्वप्नात स्वत:ला घोड्यावर चढताना पाहणेही शुभ मानलं जातं. याचा अर्थ आहे की तुम्हाला प्रोजेक्ट्समध्ये लाभ मिळणार आहे. जर तुम्ही कुठल्या कंपनीत नोकरी करत असाल तर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. पण, जर तुम्ही स्वत:ला घोड्यावरुन पजताना पाहात असाल तर ते अशुभ असतं.

कळंब वृक्ष

मान्यता आहे की कळंबच्या वृक्षात देवता निवास करतात. स्वप्नात कळंब वृक्ष दिसणे शुभ असते. स्वप्न शास्त्रानुसार कळंब वृक्षाला पाहणे आरोग्यासाठी चांगलं राहातं आणि धन प्राप्ती होते.

पाऊस पाहाणे

स्वप्नात पाऊस पाहाणे शुभ असते. याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या कुठल्या गोष्टीत गुंतवणूक केली असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्याशिवाय तुमची लव्ह लाईफही चांगली राहील. पाऊस पडण्याचा अर्थ आहे की तुमचं वैवाहिक जीवन आनंदमय राहील.

स्वप्नात गाय दिसणे

शास्त्रांमध्ये गायीचं मोठं महत्त्व आहे. मानलं जातं की गायीत सर्व देवी-देवतांचा वास असतो. स्वप्नात गायीचं दूध निघताना पाहणे अत्यंत शुभ मानलं जातं. गायीला पाहण्याचा अर्थ आहे की तुमच्या संपत्तीत वृद्धी होणार आहे. याचा अर्थ आहे की तुम्हाला धन-लाभ होणार आहे.

Know The Meaning Of Dreams That You Are Seeing Might Give You Some Good Sign About Future

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

घरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का? जाणून घ्या यामागील कारण…

रामायण काळातील वैशिष्ट्यपूर्ण विमानं, अत्याधुनिक तंत्रज्ञानही का पडते फिके?