AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरात इंडक्शन कुकटॉप्स ठेवण्याआधी ‘हे’ 4 वास्तू नियम जाणून घ्या

इंडक्शन कुकटॉप्स आता प्रत्येक आधुनिक स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनला आहे.पण तुम्हाला माहित आहे का की ते चुकीच्या दिशेला इंडक्शन ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात इंडक्शन कुकटॉप्स ठेवण्याआधी 'हे' 4 वास्तू नियम जाणून घ्या
induction cookerImage Credit source: Glen
| Edited By: | Updated on: Apr 16, 2026 | 4:48 PM
Share

आजच्या वेगवान जगात आपले स्वयंपाकघरामध्ये बरीच अत्याधुनिक वस्तू वापर आहोत. पूर्वी गॅस स्टोव्हचा वापर सर्वसामान्य होता, पण आता इंडक्शन कुकटॉप्सने त्याची जागा घेतली आहे. अशातच हे वापरायला सोपे, सुरक्षित आणि स्वच्छ करायला खूप सोपं आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण गॅस स्टोव्हसाठी जे वास्तूचे नियम पाळतो, तेच इंडक्शन कुकटॉप्सनाही लागू होतात का?

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जा केंद्र आहे आणि तिथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आरोग्यावर आणि समृद्धीवर परिणाम होतो. जर तुम्ही इंडक्शन कुकर वापरत असाल, तर काही लहान पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण स्वयंपाकघरात इंडक्शन कुकटॉप्स ठेवण्याआधी याबद्दल काही वास्तू टिप्स जाणून घेऊयात.

1. योग्य दिशा निवडणे

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील अग्नी आग्नेय दिशेला, म्हणजेच ‘आग्नेय कोपऱ्यात’ असावा. ही दिशा अग्नी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. या दिशेवर शुक्राचार्यांचे अधिपत्य असून मंगळ ग्रहाचाही प्रभाव असतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर, विद्युत उपकरणे, जनरेटर, तसेच सुख आणि समृद्धीसाठी हे स्थान सर्वोत्तम मानले जाते.

इंडक्शन कुकटॉप्स उष्णता निर्माण करते आणि त्यांचा वापर स्वयंपाकासाठी होत असल्यामुळे त्यांना स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. यामुळे घरात शांतता आणि आनंद टिकून राहण्यास मदत होते.

2. स्वयंपाक करताना तुमची उभी राहण्याची योग्य दिशा

इंडक्शन कुकटॉप्स अशा प्रकारे सेट करा की स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असेल. असे मानले जाते की पूर्वेकडे तोंड केल्याने जेवणामध्ये शुद्धता येते आणि स्वयंपाक करणाऱ्याचे आरोग्य सुधारते. वास्तूनुसार दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे तणावाचे कारण मानले जाते.

3. पाणी आणि आग यांच्यातील अंतर

हा एक अतिशय सोपा पण महत्त्वाचा नियम आहे. इंडक्शन कुकटॉप आणि सिंक किंवा पिण्याच्या पाण्याची भांडी थेट एकमेकांच्या शेजारी ठेवू नयेत. वास्तूनुसार अग्नी आणि जल यांच्या संयोगामुळे संघर्ष निर्माण होतो ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो. त्यांच्यामध्ये किमान 2-3 फुटांचे अंतर ठेवा.

4. स्वच्छता आणि देखभाल

गॅसच्या शेगडीवर डाग पडणे सामान्य आहे, परंतु इंडक्शन कुकटॉपच्या काचेसारख्या पृष्ठभागावर घाण लगेच दिसते. वास्तूशास्त्रानुसार खराब शेगडी किंवा इंडक्शन कुकटॉप गरिबीला आमंत्रण देते. वापरानंतर ते नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच जर तुमच्या इंडक्शन कुकटॉपची काच फुटली असेल, तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा बदलून घ्या, कारण फुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात.

हे वास्तु नियम वास्तुशास्त्राच्या प्राचीन तत्त्वांवर आणि घर बांधणीच्या पारंपरिक मानकांवर आधारित आहेत, जे पंचमहाभूतांच्या (अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश) संतुलनावर भर देतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा