Photo at Wall | घराच्या भिंतींवर ही 6 चित्रे अजिबात लावू नका, नाहीतर अर्थिक नुकसान झाले म्हणून समजा

आपली वास्तू पाच तत्वांवर आधारित असते. या तत्त्वांचा परिणाम आपल्या सुख-समृद्धीशी असतो. अशात घर सजवताना वास्तु नियमांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घराच्या भिंतींचे सौंदर्य वाढवणारी चित्रे तुमच्या दु:खाचे कारण बनू शकतात.

Photo at Wall | घराच्या भिंतींवर ही 6 चित्रे अजिबात लावू नका, नाहीतर अर्थिक नुकसान झाले म्हणून समजा
photo

मुंबई : आपली वास्तू पाच तत्वांवर आधारित असते. या तत्त्वांचा परिणाम आपल्या सुख-समृद्धीशी असतो. अशात घर सजवताना वास्तु नियमांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घराच्या भिंतींचे सौंदर्य वाढवणारी चित्रे तुमच्या दु:खाचे कारण बनू शकतात. आपण ज्या गोष्टींचा विचार करतो किंवा ज्या गोष्टी आपल्या आसपास असतात त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे घरामध्ये कोणतेही चित्र लावताना त्याच्याशी संबंधित शुभ आणि अशुभ गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात घरातील भिंतीवर लावावयाच्या चित्रांशी संबंधित वास्तू नियम.

  • ही चित्रे घरात अजिबात लावू नका वास्तु नियमानुसार घरातील प्रत्येक खोलीत देवाची चित्रे लावू नयेत. घराचा फक्त ईशान्य कोपरा देवांच्या फोटोसाठी योग्य मानला जातो. तसेच नटराज आणि माता लक्ष्मी यांचे उभे चित्र किंवा मूर्ती चुकूनही घरात ठेवू नये.
  • बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये परिवाराचा फोटो लावतो पण या फोटोत तीन लोकांचा सहभाग नसावा याची पूर्ण काळजी घ्या. वास्तूशास्त्रानुसार भिंतीवर कुटुंबातील तीन सदस्यांचे फोटो अशुभ मानले जातात.
  • घरामध्ये डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याचे चित्र घरात लावू नये. अशा चित्रातून निर्माण होणाऱ्या वास्तुदोषामुळे पैसा खर्च होतो. अशी मान्यता आहे.
  • मावळत्या सूर्याचे किंवा महाभारताच्या युद्धाचे चित्र घरात कधीही ठेवू नका. अशा चित्रांमुळे निराशा आणि वाद निर्माण होतात.
  • वास्तूनुसार हिंसक प्राणी, बुडणारे जहाज आणि ताजमहाल यांचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवू नये. अशी चित्रे तुमच्या घरातील लोकांमध्ये हिंसा किंवा निराशेची भावना निर्माण करतात.
  • ही चित्रे घरात नक्की ठेवा वास्तूशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे चित्र उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे यामुळे घरामध्ये धन-धान्य वाढवण्यासाठी मदत होते.
  • घराच्या उत्तर दिशेला आपल्या कुटुंबाचा फोटो लावल्याने नात्यात प्रेम वाढते.
  • वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र लावावे.

Published On - 7:00 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI