AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोगाचा दुर्मिळ संयोग, ‘या’ 3 राशींच्या लोकांना प्राप्त होणार आर्थिक लाभ

25 जून रोजी निर्जला एकादशीला एक दुर्मिळ लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होत आहे. या संयोगामुळे 24 एकादशींचे फळ मिळते आणि धन, सुख व समृद्धी लाभते. या योगाचा काही राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा होईल. चला तर मग राशींबद्दल आपण जाणून घेऊयात.

निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोगाचा दुर्मिळ संयोग, 'या' 3 राशींच्या लोकांना प्राप्त होणार आर्थिक लाभ
निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोगाचा दुर्मिळ संयोग Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 18, 2026 | 1:42 PM
Share

वर्षातील सर्वात मोठी निर्जला एकादशी लवकरच येणार आहे. निर्जला एकादशीचा उपवास 25 जून रोजी केला जाणार आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या एकादशीला उपवास केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशींच्या उपवासांचे पूर्ण फळ मिळते. तसेच या उपवासाच्या प्रभावामुळे मृत्यूनंतर वैकुंठ धामात स्थान मिळते. अशातच या निर्जला एकादशीला एक दुर्मिळ ग्रहयोग होणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी-नारायण राजयोग निर्माण होईल. निर्जला एकादशीच्या दिवशी ग्रहांचा स्वामी बुध आणि सुख-समृद्धी देणारा शुक्र हे कर्क राशीत एकत्र विराजमान होतील. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुध आणि शुक्र एकाच राशीत किंवा घरात असतात, तेव्हा ते लक्ष्मी नारायण राजयोग तयार करतात. निर्जला एकादशीला बुध आणि शुक्र हा राजयोग तयार करतील. बुध आणि शुक्राच्या संयोगाने तयार होणारा लक्ष्मी नारायण योग आनंद, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ, भौतिक सुखसोयी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. हे दुर्मिळ योग या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या आहेत या राशीं त्याबद्दल जाणून घेऊयात.

वृषभ रास

लक्ष्मी नारायण राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ परिणाम देऊ शकतो. या काळात करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिक योजनांमधून नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना रोजगार मिळू शकतो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते.

कर्क रास

कर्क राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग आर्थिक प्रगती दर्शवतो. या काळात तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळू शकते. तुमचे उत्पन्न वाढू शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्न वाढेल आणि तुमचा सामाजिक सन्मानही वाढेल.

तूळ रास

तूळ राशीसाठी हा राजयोग यशाचे दरवाजे उघडू शकतो. दीर्घकाळापासूनच्या समस्या सुटू शकतात. कामात आणि व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. आत्मविश्वास वाढू शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. या काळात एखादा आजार बरा होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत