AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse: वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ शहरांमध्ये दिसणार?

Chandra Grahan 2025 : भाद्रपद पौर्णिमा म्हणजे 7 सप्टेंबर रोजी चंद्र ग्रहण दिसणार आहे. आजच्या दिवशीच पितृपक्षाची देखील सुरुवात होणार आहे. अशात जाणून घ्या भारतातील कोणत्या कोणत्या शहरांत चंद्र ग्रहण दिसणार आहे. शिवाय वेळेबद्दल देखील घ्या जाणून...

Lunar Eclipse: वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण, भारतातील 'या' शहरांमध्ये दिसणार?
| Updated on: Sep 07, 2025 | 12:03 PM
Share

Chandra Grahan 2025 7 September Timing: भारतात यंदाच्या वर्षीतील शेवटचा आणि दुसरा चंग्र ग्रहण दिसणार आहे. या दरम्यान आकाशात ‘ब्लड मून’चं एक अद्भुत दृश्य पहायला मिळणार आहे. हे शेवटचं चंद्रग्रहण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होत आहे. चंद्र ग्रहण 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळपासून सुरू होणार असून 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1:26 वाजेपर्यंत भारतातील अनेक शहरांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सुतक देखील लागू होईल… असं म्हणत आहेत.

वर्षांच शेवटचं चंद्र ग्रहण 82 मिनिटांचं असणार आहे. ग्रहण संपताच सुतक देखील संपेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. सुतक दरम्यान पूजा-पाठ किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे. प्रथम आपण भारतातील कोणत्या शहरांमध्ये ग्रहण दिसेल आणि त्याची वेळ काय असेल ते पाहूया?

चंद्र ग्रहणाचा सुतक काळ…

चंद्र ग्रहणाचा सुतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. सुतक काळ चंद्रग्रहणानंतरच संपतो. चंद्र ग्रहण भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:58 रोजी सुरु होणार आहे आणि 8 सप्टेंबर रोजी रात्री 1.26 वाजता समाप्त होणार आहे.

सुतक काळाची सुरुवात – सुतक काळ दुपारी 12:57 वाजता चंद्रग्रहण संपल्यानंतर संपेल. रात्री 11 वाजल्यापासून चंद्राचं दृश्य दिसेल आणि रात्री 11.42 वाजता तो त्याच्या शिखरावर असेल.

कोणत्या शहरांमध्ये दिसेल चंद्रग्रहण?

– उत्तर भारत: दिल्ली, चंदीगड, जयपूर, लखनऊ

– पश्चिम भारत: मुंबई, अहमदाबाद, पुणे

– दक्षिण भारत: चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोची

– पूर्व भारत: कोलकाता, भुवनेश्वर, गुवाहाटी

चंद्रग्रण फक्त भारतात नाही तर, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफ्रिका यांसारख्या देशांमध्ये चंद्र ग्रहण दिसणार आहे.

चंद्र ग्रहण काळात कोणत्या गोष्टीची घ्याल काळजी?

जेव्हा चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होतो, तेव्हा तुम्ही चुकूनही पूजास्थळावरील मूर्तीला स्पर्श करू नका. ग्रहणाच्या सुतक काळापासून ग्रहण संपेपर्यंत पूजास्थळ झाकून ठेवा. यासाठी तुम्ही लाल किंवा पिवळ्या कापडाचा वापर करू शकता. ग्रहण काळात तुम्ही अन्न शिजवणं किंवा खाणं टाळावं.

ग्रहण काळात चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात नखं आणि केस कापणं देखील चांगलं मानलं जात नाही. ग्रहण काळात कात्री, चाकू, सुई आणि धागा वापरणं देखील टाळावं.

मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.