AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu tips | बाथरूमशी संबंधित वास्तु नियम जाणून घ्या, आणि आजारांना लांब ठेवा

घरातील खोल्या, स्वयंपाकघर, स्नानगृह यासाठी वास्तु नियम बनवले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात बाथरूमशी संबंधीत नियम.

Vastu tips | बाथरूमशी संबंधित वास्तु नियम जाणून घ्या, आणि आजारांना लांब ठेवा
Bathroom-related-vastu-tips
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 7:00 AM
Share

मुंबई : घरामध्ये बाथरूम (Bathroom Tips) अशी जागा आहे जिथे नेहमी ओलावा असतो. या कारणास्तव बाथरूमच्या वातावरणात जीवाणू जन्माला येतात. यामुळेच असे म्हटले जाते की, शक्यतो तुमचा फोन टॉयलेट किंवा बाथरूममध्ये नेऊ नका, कारण ते जंतू फोनद्वारे आपल्या तोंडात पोहोचू शकतात, ज्यामुळे आजार होऊ शकतो. वास्तूनुसार (Vastu Shastra)घरात सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी अनेक नियम बनवले आहेत. त्यांचे योग्य पालन केल्यास जीवनात सकारात्मकता राहते आणि आरोग्यही चांगले राहते, असे म्हणतात. अनेक वेळा कमी जागा आणि इतर कारणांमुळे वास्तूनुसार गोष्टींची मांडणी केली जात नाही आणि अशा परिस्थितीत वास्तुदोषाची स्थिती कायम राहते. पाहिलं तर मंदिराप्रमाणे घरातील खोल्या, स्वयंपाकघर, स्नानगृह यासाठी वास्तु नियम बनवले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात बाथरूमशी संबंधीत नियम

या दिशेला ठेवा बाथरूम (Bathroom Tips) असे मानले जाते की जर बाथरूम दक्षिण किंवा आग्नेय आणि नैऋत्य दिशेला असेल तर ते वास्तुदोष आहे. यामुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात आणि त्यांचा दीर्घकाळ शरीरावर परिणाम होतो. वास्तूनुसार घराचे स्नानगृह उत्तर-पश्चिम दिशेला असावे.

बाथरूमशी संबंधित वास्तु नियम (Vastu rules) बाथरूममध्ये आरसा ठेवण्यासाठी वास्तूमध्ये दिशा सांगितली आहे. असे म्हणतात की बाथरूममध्ये बसवलेल्या आरशाची दिशा नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे असावी.

जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल तर बाथरूममध्ये वॉशबेसिन आणि शॉवर पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावा. त्याचबरोबर येथे ठेवलेल्या वॉशिंग मशीनची दिशा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी.

बाथरूममध्ये रंग नेहमी हलका असावा किंवा फरशा वापरल्या गेल्या असतील तर त्याही हलक्या रंगाच्या असाव्यात.

घरात कुठूनही पाणी टपकत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. याच्याशी संबंधित वास्तू दोष घरातील सदस्यांना प्रत्येक प्रकारे दीर्घकाळ प्रभावित करतो. त्यामुळे पाण्याची समस्या आजच दूर करा.

बाथरूमच्या दरवाजा नेहमी बंद असणंच चांगले असते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आत येत नाही.

संबंधीत बातम्या :

Vastu | सावधान! घरात हे बदल आजच करा नाहीतर आनंदाला ग्रहण लागच म्हणून समजा

Diya Rmedies | शुभं करोति कल्याणम् ! दिवांच्या तेज्योमय प्रकाशात तुमचे आयुष्य करा प्रकाशित, जाणून घ्या दिव्यांबद्दल रंजक माहिती

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 3 गोष्टींबाबत नेहमी असमाधानी राहा, यश तुमचेच असेल

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.