Marathi News » Photo gallery » Be careful! Make these changes at home today or else consider happiness as an eclipse
Vastu | सावधान! घरात हे बदल आजच करा नाहीतर आनंदाला ग्रहण लागच म्हणून समजा
दररोज आपण खूप काम करतो आणि यादरम्यान जाणून-बुजून आपल्याकडून काही चुकाही होतात. कधी कधी चुकांमुळे किरकोळ नुकसान होते पण छोट्या चुकांमुळे माणसाची आर्थिक प्रगती, करिअरची प्रगती थांबते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
देवाच्या मूर्ती-फोटो पूजाघरात समोरासमोर कधीही ठेवू नयेत. असे केल्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग बंद होतो. पैसे मिळण्यात अडथळे येतात.
1 / 5
घरातील झाडूबाबत काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. झाडूला कधीही पाय मारू नका. लपवून ठेवा. तिजोरीजवळ कधीही ठेवू नका. असे केल्याने धनहानी होते. हिंदू धर्मात झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे कधीही झाडूला पाय लावू नका.
2 / 5
तुटलेली भांडी कधीही वापरू नका. फाटलेले बूट किंवा कपडे घालू नका. असे केल्याने घरात पैसा येण्याचा मार्ग बंद होतो.
3 / 5
फाटलेली पर्स कधीही जवळ बाळगू नका. पर्सचा थेट संबंध आपल्या उत्पन्नाशी असतो. फाटलेल्या पर्समुळे तुमचे उत्पन्न कमी व्हायला वेळ लागणार नाही.
4 / 5
घरात बोन्सायचे झाड लावल्याने प्रगती थांबते. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कधीही बोन्सायची झाडे लावू नका. याशिवाय काटेरी झाडे, झाडे लावू नयेत.