रात्री नखे का कापू नयेत? काय म्हणतं शास्त्र? काय असते योग्य दिवस अन् वेळ
तर शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरची अनेक कामे शास्त्रांमध्ये अशुभ मानली जातात. त्याकामांमध्ये रात्री नखे कापणे अशुभ मानले जाते. त्यामागे अनेक कारणे आहेत. चला जाणून घेऊयात ही कारणे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

शास्त्रात अनेक योग्य अयोग्य गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी सकाळी देवाची प्रार्थना करण्याची योग्य वेळ ते सायंकाळी जेवणाची योग्य वेळ काय आहे? अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे नखे कापणे. शास्त्रात नखे कापण्याबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ते कधी कापावेत? नखे कापण्याची योग्य वेळ काय आहे? अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितलं गेलं आहे. त्याबाबतीतील एक महत्त्वाचा नियम म्हणजे रात्री नखे कापू नयेत.
रात्री नखे कापू नयेत असे म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात नखे कापण्याबाबत काही नियम सांगितले आहेत आहेत. त्यानुसार, चुकीच्या दिवशी किंवा वेळी नखे कापल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे आर्थिक नुकसान यासह विविध समस्या उद्भवू शकतात. तथापि, योग्य वेळी नखे कापणे देखील फायदेशीर मानले जाते. नखे कापण्याची योग्य वेळ आणि दिवस जाणून घेऊयात.
रात्री नखे का कापू नये?
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री नखे कापणे नकारात्मक ऊर्जा वाढवते, ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. संध्याकाळ आणि रात्र ही संपत्तीची देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. या वेळी नखे कापणे अशूभ मानले जाते. त्यामुळे आयुष्यात दुर्दैव येते असे म्हटले जाते,सतत तुम्ही संध्याकाळच्या वेळी नखे कापत असाल तर नक्कीच दारिद्र्य येऊ शकते.
या दिवसांत नखे कापल्याने गरिबी येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी नखे कापू नयेत. शिवाय, अमावस्या आणि नवरात्र यांसारख्या काही महत्त्वाच्या व्रतांना आणि सणांना नखे कापू नयेत. सोमवार, रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे नखे कापण्यासाठी शुभ मानले जातात.
या दिवसांत नखे कापल्याने गरिबी येते.
शनिवार – शनिवारी नखे कापल्याने आयुष्य कमी होते आणि घरात दारिद्र्य येते.
मंगळवार – मंगळवारी नखे कापल्याने भावांशी वाद होऊ शकतो, धैर्य आणि शौर्य कमी होऊ शकते आणि रक्ताशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
गुरुवार – गुरुवारी नखे कापल्याने शिक्षण आणि ज्ञानात नुकसान होते तसेच पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.
नखे कापण्याची योग्य वेळ
नखे कापण्याची योग्य वेळ म्हणजे आंघोळीनंतरची. या काळात साबण आणि पाण्यामुळे नखांची पोत मऊ झालेली असते. ज्यामुळे ते कापणे सोपे होते. नखे कापल्यानंतर हात चांगले धुवा. रात्री नखे कापणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण पूर्वी वीज उपलब्ध नसायची त्यामुळे नखे कापल्यानंतर अंधारात ते चुकून जेवणात गेले तर नक्कीच त्यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. कारण नखे पोटात जाणे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक असते. त्याचे आरोग्यावर फार वाईट परिणाम होतात. त्यामुळे ते देखील एक कारण आहे. की सूर्यास्तानंतर कधीही नखे कापू नयेत.
शास्त्र काय म्हणते?
तर शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरची अनेक कामे शास्त्रांमध्ये अशुभ मानली जातात. ज्यात रात्री नखे कापणे देखील समाविष्ट आहे. यामुळे घरात गरिबी येते. कारण संध्याकाळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे या वेळी नखे कापणे, केस कापणे, केस विंचरणे किंवा घर स्वच्छ करणे यासारखी काही कामे करणे अशुभ मानले जाते. म्हणून, तुम्ही ही कामे सूर्यास्तापूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
