AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lord Krishna | भगवान श्रीकृष्णाच्या चमत्कारी मंत्रांचा जप करा, आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील

हरे कृष्ण हरे राम या मंत्राच जप फक्त भारतातच (India) नाही तर संपूर्ण जगभर होतो. भारतात जप करण्यास खूप महत्त्व प्राप्त आहे. मंत्रांचा (Mantra) जप केल्याने आपल्या शरीरामध्ये कंपने निर्माण होतात. ही कंपने आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात.

Lord Krishna | भगवान श्रीकृष्णाच्या चमत्कारी मंत्रांचा जप करा, आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील
Lord Krishna
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 5:00 PM
Share

मुंबई : हरे कृष्ण हरे राम या मंत्राच जप फक्त भारतातच (India) नाही तर संपूर्ण जगभर होतो. भारतात जप करण्यास खूप महत्त्व प्राप्त आहे. मंत्रांचा (Mantra) जप केल्याने आपल्या शरीरामध्ये कंपने निर्माण होतात. ही कंपने आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात.तज्ञांच्या मते, या मंत्राचा जप केव्हाही आणि कितीही वेळा केला जाऊ शकतो. यामुळे तुमचा देवाशी घट्ट नाते (Relation)निर्माण होते.जेव्हा आपण या जीवनात अनेक नातेसंबंध तयार करतो, तर काही आयुष्यभर आपल्यासोबत राहतात, तर काही आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने सोडून जातात. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत आणि प्रेमळ नातेसंबंध हे खरोखरच आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि आपले जीवन जगण्यास योग्य बनवते. भगवान श्रीकृष्णाचा जप केल्यामुळे आपले देवासोबत नाते घट्ट् होते अशी मान्यता आहे.

हे आपल्याला स्वतःशी जोडण्यास मदत करते जसजसे आपण मोठे होतो काळाच्या ओघात आपला कल हळूहळू भौतिक गोष्टींकडे होऊ लागतो. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आपल्याला भौतिक गोष्टींचे नुकसान होण्याची भीती वाटू लागते. ही भीती जगत असताना आपण आपले खरे स्वरूप गमावून बसतो. हरे कृष्ण मंत्राचा जप आपल्याला स्वतःशी जोडण्यास मदत करतो. आपण स्व:ताचा शोध घेतो.

हे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते या मंत्राचा जप केल्याने तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते ज्यांचा मनावर ताबा असतो. ते शांत आणि आनंदी जीवन जगतात. भगवद्गीतेनुसार ज्यांचे मनावर ताबा नाही, त्यांचे मन त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनते. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला शांती आणि मनावर नियंत्रण मिळण्यास मदत होते.

ते तुम्हाला मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते प्रत्येकाला जीवनाच्या चक्रातून मुक्त व्हायचे असते पण ही मुक्ती सोपी नसते. जन्म आणि मृत्यूचे हे अंतहीन चक्र तेव्हाच प्राप्त होऊ शकते जेव्हा आपण भौतिक गोष्टींच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त होऊ. जे हरे रामा हरे कृष्णाचा जप करतात ते कोणत्याही भौतिक इच्छांपासून मुक्त होऊन परमेश्वराशी जोडू शकतात. मोक्षप्राप्तीसाठी पुढे मदत होते.

श्रीकृष्णाचे सोबती

बासरी भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय होती आणि तो प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी गोड वाजवत असत की बासरीचा सूर ऐकून लोक त्यात मग्न होऊन जायचे. पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाची बासरी वाजवण्याचा हेतू काही औरच होता. वास्तविक, बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे, याचा अर्थ असा की परिस्थिती कशीही असो, आपण नेहमी आनंदी रहावे आणि आपले मन आनंदी ठेवून इतरांमध्ये आनंद वाटावा. ज्याप्रमाणे कान्हा स्वतः बासरी वाजवून आनंदी असायचा आणि इतरांना आनंद द्यायचा.

मोरपीस मोराच्या पंखांमध्ये अनेक प्रकारच्या रंगांचा समावेश असतो. हे रंग जीवनाच्या परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. मोराच्या पंखांचा गडद रंग दुःख आणि अडचणींचे प्रतीक आहे, फिकट रंग आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्हीमधून जावे लागते. परंतु दोन्ही परिस्थितींमध्ये ते समान राहिले पाहिजे. याशिवाय मोर हा एकमेव प्राणी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचर्याचे व्रत पाळतो. प्रेमाबरोबरच तो स्वतःमध्ये आनंदी असतो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.