Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्री, जाणून घ्या पुजेचा विधी आणि मुहूर्त

या दिवशी भगवान शिवाचे भक्त त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. या दिवशी रात्रीची पूजा देखील केली जाते.

Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्री, जाणून घ्या पुजेचा विधी आणि मुहूर्त
महाशिवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 6:30 AM

मुंबई, महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) शुभ सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. आज 18 फेब्रुवारी ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा पवित्र सण भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाचे भक्त त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. या दिवशी रात्रीची पूजा देखील केली जाते, परंतु यापेक्षा चार प्रहराची पूजा अधिक महत्त्वाची आहे. असे मानले जाते की, या पुजेमूळे मनुष्य जीवनातील पापांपासून मुक्त होतो.

महाशिवरात्री पूजा पद्धत

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडाला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर केशराचे पाणी अर्पण करावे. त्या दिवशी रात्रभर दिवा लावावा. चंदनाचा तिलक लावावा. बेलपत्र,  धतुरा, जायफळ, कमलगट्टा, फळे, मिठाई, गोड पान, अत्तर आणि दक्षिणा अर्पण करा. शेवटी केशर असलेली खीर अर्पण करून प्रसाद वाटावा. ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमः शिवाय रुद्राय शांभवाय भवानीपतये नमो नमः या मंत्रांचा जप करा. या दिवशी शिवपुराण वाचावे. महाशिवरात्रीच्या दिवशीही रात्रीची जागर केली जाते.

महाशिवरात्री शुभ मुहूर्त

आज देशभरात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची चतुर्दशी तारीख 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 08:02 वाजता सुरू होईल आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 04:18 वाजता समाप्त होईल. निशिता काळात महाशिवरात्रीची पूजा केली जाते. महाशिवरात्री पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06.10 ते दुपारी 02.40 पर्यंत

हे सुद्धा वाचा

महाशिवरात्रीला त्रिग्रही योग

यंदाचा महाशिवरात्री हा सण विशेष असणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार होणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी न्यायमूर्ती देव शनी कुंभ राशीत बसले होते. आता 13 फेब्रुवारीला सूर्य ग्रहांचा राजाही या राशीत प्रवेश करणार आहे. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशीत असेल. त्यामुळे कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांनी हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला आहे.

महाशिवरात्रीला शिवाला काय अर्पण करावे

या दिवशी भगवान शंकराला तीन पानांसह बेलपत्र अर्पण करा. भगवान शंकरांना भांग खूप आवडते, म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करा. भगवान शंकराला धतुरा आणि उसाचा रस अर्पण करा. यामुळे जीवनात आनंद वाढतो. पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे मनाची चंचलता दूर होते.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.