AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 शुभेच्छा पाठवा, कुणाची कन्नी तर कुणाचा दोरा गुल होईल; Makar Sankrati च्या द्या हटके शुभेच्छा

यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. देशभर साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी मकर संक्राती हा एक मोठा उत्सव आहे. देशभरात या उत्सवाची धूम असते. या दिवशी पतंग उडवून आनंद साजरा केला जातो.

'या' 5 शुभेच्छा पाठवा, कुणाची कन्नी तर कुणाचा दोरा गुल होईल; Makar Sankrati च्या द्या हटके शुभेच्छा
Makar SankrantiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2024 | 9:17 PM
Share

मुंबई | 13 जानेवारी 2023 : यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. देशभर साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी मकर संक्राती हा एक मोठा उत्सव आहे. देशभरात या उत्सवाची धूम असते. या दिवशी पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. लहानांपासून वृद्धांपासून सर्वचजण पतंग उडवण्याचा आनंद लुटत असतात. तरुणीही आणि गृहिणीही पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. याच दिवशी एकमेंकाना तिळगुळ देऊन नात्यात गोडवा निर्माण केला जात असतो. त्यासाठी एकमेकांना तीळगुळ भरवला जात असतो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात असतात. आम्हीही तुम्हाला असेच पाच शुभेच्छा संदेश घेऊन आलोय. तुमच्या मित्रमंडळींना नक्की पाठवा.

मकर संक्रातीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होत असते. या स्थितीलाच मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. तसेच याच दिवशी सूर्य उत्तरेकडे वळतो, त्यामुळे त्याला उत्तरायणही म्हटलं जातं. मकर संक्रांती साधारण हिवाळ्यात येते. पण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्यास सुरुवात होते. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू दिले जातात. तिळ आणि गुळ मिळून हे लाडू तयार केलेले असतात. हे लाडू खालल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.

घ्या शुभेच्छा… द्या शुभेच्छा…

… मराठमोळा सण

क… कणखर बाणा

र … रंगीबिरंगी तिळगुळ

सं… संगीतमय वातावरण

क्रा… क्रांतीची मशाल…

त …तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

—————–

क तिळ रुसला, फुगला,

रडत रडत गुळाच्या पाकात पडला,

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला,

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

—————–

तिळाची गोडी, प्रेमाची माडी,

माडीचा जिना, प्रेमाच्या खूणा, मायेचा पान्हा,

साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,

मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

——————-

तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच,

सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,

मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.

————————–

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.