हा चमत्कार नाही तर काय? अमरनाथमधील फक्त या गुफेतच दिसतो एक कबुतराचा जोडा, अमर पक्षी का म्हटलं जातं?; काय आहे रहस्य?
अमरनाथ गुहेत भोलेनाथांनी माता पार्वतीला मोक्षाचा मार्ग दाखवला, म्हणूनच या गुहेला अमरनाथ गुहा म्हणून ओळखले जाते. या गुहेत कबुतरांची जोडी दिसते, चला जाणून घेऊया त्या जोडीचे रहस्य काय आहे.

हिंदू धर्मात अमरनाथ गुफा मंदिराला पवित्र तीर्थस्थान मानले जाते, ज्याच्या दर्शनाने अनेक पटींनी पुण्य मिळते. 2025 मध्ये 3 जुलै, गुरुवारपासून अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली आहे. या दिवशी पहिला जत्था रवाना झाला आहे. अमरनाथ गुफा मंदिर हे हिंदू धर्मातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की याच ठिकाणी भगवान शंकरांनी माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते.
अमरनाथ यात्रा कधीपासून कधीपर्यंत होते?
दरवर्षी भोलेनाथ बाबांच्या पवित्र गुफेत नैसर्गिकरित्या शिवलिंग तयार होते. बर्फापासून बनलेल्या या शिवलिंगाला ‘बाबा बर्फानी’ असेही म्हणतात. दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा आषाढ पौर्णिमेपासून या यात्रेची सुरुवात होते आणि श्रावण महिनाभर ही यात्रा चालते. रक्षाबंधनाच्या दिवशी ती समाप्त होते. असे म्हटले जाते की, श्रावण पौर्णिमेच्या तिथीला शिवलिंग आपल्या पूर्ण आकारात येते.
वाचा: धक्कादायक खुलासा! टीम इंडियाच्या या खेळाडूसोबत बॉबी डार्लिंगचा वन नाईट स्टँड
कबुतराच्या जोडीचे रहस्य
बाबा बर्फानीच्या गुफेत कबुतरांचे एक जोडपे दिसते. असे म्हटले जाते की, जेव्हा भोलेनाथ या गुफेत माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगत होते, तेव्हा या कबुतरांनीही ती अमरकथा ऐकली आणि ते अमर झाले. त्यांना ‘अमर पक्षी’ मानले जाते. ज्या श्रद्धाळूंना हे जोडपे दिसते, त्यांना भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या दर्शनासमान पुण्य मिळते. अशी मान्यता आहे की, ज्यांना या कबुतरांचे दर्शन होते, त्यांना भोलेनाथ मुक्ती प्रदान करतात.
अमरकथेचे महत्त्व
असेही मानले जाते की, भगवान शंकरांनी आपल्या अर्धांगिनी माता पार्वतीला या गुफेत एक अशी कथा सांगितली होती, ज्यामध्ये अमरनाथ यात्रा आणि त्या मार्गातील अनेक स्थळांचे वर्णन आहे. ही कथा ‘अमरकथा’ म्हणून ओळखली जाते. ही कथा अमरनाथ यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते आणि श्रद्धाळूंना या पवित्र यात्रेकडे आकर्षित करते.
