Nag Panchami 2021 : आजच्या दिवशी नाग देवतेचे पूजन केल्यानंतर हे 4 पदार्थ नक्की खा

नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा करण्याचा आणि सापांना दुधाने आंघोळ घालण्याची परंपरा आहे. यावर्षी नाग पंचमीचा सण आज 13 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात, तसेच घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

Nag Panchami 2021 : आजच्या दिवशी नाग देवतेचे पूजन केल्यानंतर हे 4 पदार्थ नक्की खा
nag-panchami
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 13, 2021 | 12:59 PM

मुंबई : नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा करण्याचा आणि सापांना दुधाने आंघोळ घालण्याची परंपरा आहे. यावर्षी नाग पंचमीचा सण आज 13 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात, तसेच घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

नाग पंचमीला सापांची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्य सापांच्या भीतीपासून मुक्त होतात, असेही मानले जाते. जर कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर तो दूर होतोतो. नाग पंचमीच्या दिवशी 4 गोष्टी नक्की खाव्या असेही सांगितले गेले आहे. या गोष्टी गोड, आंबट, कडू आणि चवीला तिखट असाव्यात. असे मानले जाते की ते सर्पदंशापासून संरक्षण करतात. जाणून घ्या आज कोणत्या गोष्टी खाणे महत्वाचे आहे.

खीर जरूर खावी

नाग पंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या पूजेदरम्यान खीरीचे नैवेद्य दिले जाते. यासोबतच या दिवशी खीर खाण्याचेही चलन आहे. अशी मान्यता आहे की नाग पंचमीच्या दिवशी, आस्तिक मुनीने राजा जनमेजय यांच्या यज्ञात जळणाऱ्या सापांना आपल्या तपोबलाने वाचवले होते आणि त्यांना दुधाने आंघोळ घातली होती. यामुळे सापांचा जळण्यापासून होणारा त्रास शांत झाला. त्या दिवसापासून हा उत्सव नागलोकमध्ये श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाऊ लागला. या दिवशी सण म्हणून देवी, देवता आणि सर्प देवतांना खीर अर्पण केली जाते. पूजेनंतर ही गोड खीर खाल्याने नाग देवता आणि इतर देवतांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात.

दह्यात शिजवलेला भात

या दिवशी ताक किंवा दह्यामध्ये तांदूळ शिजवून सर्पदेवतेला अर्पण करावे आणि नंतर ते स्वतः सेवन करावे. यामुळे सर्पाच्या भीतीपासून सुटका होते. बिहारच्या काही भागात, तांदूळ दहीमध्ये शिजवले जातात आणि विशेष प्रसंगी खाल्ले जातात.

लिंबू खा

अशी मान्यता आहे की नाग देवतेची पूजा केल्यानंतर या दिवशी लिंबू नक्की खावे आहे. जर तुम्ही लिंबू खाल्ले तर त्याने सर्पदेवतेचे दातही आंबट होऊ शकते. त्यामुळे पूजेनंतर लिंबू खाण्यास विसरु नका.

कडुलिंबाची पाने चावून खा

या दिवशी कडुलिंबाची पानेही चावली पाहिजेत. कडुलिंबाची पाने कडू असतात आणि एक कडू गोष्ट नाग पंचमीच्या दिवशी खाण्यास सांगितले गेले आहे. अशा स्थितीत कडूलिंबाची पाने खाण्याची प्रथा बऱ्याच काळापासून सुरु आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Nag Panchami 2021 | या मंदिरात स्वत: नागराज तक्षक निवास करतात, फक्त नाग पंचमीलाच उघडतात मंदिराचे द्वार

Nag Panchami 2021 | आज नाग पंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें