AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2023 : नवरात्रीत करा देवीच्या या मंत्राचा जाप, होतील सर्व मनोकामना पूर्ण

पौराणिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांमध्ये, माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते.

Navratri 2023 : नवरात्रीत करा देवीच्या या मंत्राचा जाप, होतील सर्व मनोकामना पूर्ण
नवरात्री २०२३Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2023 | 11:41 PM
Share

मुंबई : 5 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होत आहे. मराठी दिनदर्शिकेनुसार, शारदीय नवरात्री अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि नवमी तिथीपर्यंत चालते. पौराणिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांमध्ये, माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते. माता लक्ष्मी घरात वास करते आणि भरपूर संपत्ती देते. देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर आहे. माँ दुर्गेचे हे मंत्र खूप प्रभावी आहेत. या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील सर्व दोष आणि अडथळे दूर होतात. नवरात्री व्यतिरिक्त या मंत्रांचा रोज जप करणे खूप फायदेशीर आहे.

नवरात्रीमध्ये देवीच्या या मंत्रांचा जप करा

नवरात्रीच्या 9 दिवसांत या मंत्रांचा जप करा. मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा लावणे आणि मंत्राचा किमान 11 वेळा जप करणे चांगले.

1. ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

2. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

3. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

3. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

4. नवार्ण मंत्र ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’ कार्य सिद्धीसाठी या मंत्राचा जाप करा.

5. पिण्डज प्रवरा चण्डकोपास्त्रुता। प्रसीदम तनुते महिं चंद्रघण्टातिरुता।। पिंडज प्रवररुधा चन्दकपास्कर्युत । प्रसिदं तनुते महयम चंद्रघंतेति विश्रुत।

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.