Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीला नाही लागणार जास्त तहान, या गोष्टी अवश्य पाळा

या दिवशी व्रत केल्यास वर्षातील 24 एकादशींचे फल प्राप्त होते, असेही मानले जाते. मात्र, या व्रताचे नियम फार कठीण आहेत. यावर्षी निर्जला एकादशी 31 मे रोजी येत आहे.

Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीला नाही लागणार जास्त तहान, या गोष्टी अवश्य पाळा
निर्जला एकादशी
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 5:01 PM

मुंबई : हिंदू धर्मात निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi 2023) ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी व्रत केल्यास वर्षातील 24 एकादशींचे फल प्राप्त होते, असेही मानले जाते. मात्र, या व्रताचे नियम फार कठीण आहेत. यावर्षी निर्जला एकादशी 31 मे रोजी येत आहे. या दिवशी उष्णता जास्त राहू शकते आणि उपवास करणार्‍यांना जास्त तहान लागू शकते. अशा परिस्थितीत उपवास करणारे भावीक या प्रभावी टिप्सचा अवलंब करून स्वतःला हायड्रेट ठेवू शकतात.

निर्जला एकादशी व्रताच्या वेळी या पद्धतींचे करा पालन

  • निर्जला एकादशीला वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानले जाते. या व्रतात पाण्याचा थेंबही ग्रहण केला जात नाही. उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका असतो आणि उपवासात पाणी न पिल्याने समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत दिवसातून दोन-तीन वेळा आंघोळ करून उष्मा टाळता येतो. गरम असताना शरीराची ऊर्जा झपाट्याने खर्च होते, पण आंघोळ केल्याने आपल्याला फ्रेश वाटतं.
  • उपवासाच्या वेळी स्त्रिया जड साड्या किंवा असे कपडे घालतात, ज्याच्या फॅब्रिकमुळे जास्त उष्णता जाणवते. उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिकचे कपडे घाला. घाम शोषून घेतल्याने चिडचिड होत नाही आणि आपल्याला चिडचीड होत नाही.
  • निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये अशी कामे करू नयेत ज्यासाठी खूप शक्ती लागते. जर ऊर्जा खर्च झाली तर तुम्हाला तहान लागेल आणि उपवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  • उपवासाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा कारण चालल्याने तुम्हाला तहान लागेल. अति आवश्यक असेल तरच बाहेर जा आणि चालणे टाळा.
  • या उपवासाच्या आधी तुम्ही असा आहार घेऊ शकता ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल. यामध्ये टरबूज किंवा खरबूज यांसारख्या हंगामी फळांचा समावेश होतो. याशिवाय काकडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.