…म्हणून 8 मूलांक असलेल्या मुलींच्या लग्नाला होतो उशीर, कारण समोर
अंकशास्त्रानुसार जन्मतारखेपासून मिळणारी मूळ संख्या आणि ग्रह यांच्यातही परस्परसंबंध असतो. त्यामुळे ज्या मुलींचा मूलांक 8 आहे, त्या मुलींचे लग्न उशिरा का होते. नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

अंकशास्त्र किंवा संख्याशास्त्र ही प्राचीन विद्या असली तरी अलीकडच्या काळात त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. या शास्त्रात अंकांना सर्वाधिक महत्त्व आहे. जन्मतारखेचे अंक जोडून मूळ क्रमांक काढला ज्याला मूलांक म्हंटले जाते. या मूलांकच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, वर्तन आणि नशिबाची माहिती मिळते. तसेच यातील उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक मूलांक संख्याचा एखाद्या ग्रहाशी संबंधित असते. त्यामुळे ज्या मुलींचा मूलांक 8 येतो त्या मुलींचे लग्न उशिरा का होतात त्याचे कारण जाणून घेऊयात…
भारत देशात लग्नाला खूप मान आहे. शिवाय लग्नाशिवाय माणसाचे आयुष्य अपूर्ण मानले जाते. 16 संस्कारांपैकी विवाह हाही एक संस्कार आहे. लग्नाचे नियम आणि महत्त्व आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. याव्यतिरिक्त, लग्नासाठी योग्य वय देखील निश्चित केले आहे. मात्र कधी काही कारणास्तव लग्न केवळ इच्छेनुसार होत नाही. लग्नाला इतरही काही घटक कारणीभूत असतात, त्यापैकी एक म्हणजे ज्योतिषशास्त्र.
ज्योतिषशास्त्रात अंकांचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा स्वभाव, विचार, भविष्य आणि अगदी त्यांचे लग्न कधी जमेल याची सुद्धा गणना आकड्यांच्या आधारे मोजली जाते. याला इंग्रजीत न्यूमरोलॉजी (NEUMROLOGY) म्हणतात. आज आपण मूलांक 8 च्या बाबतीत जाणून घेणार आहोत. मूलांक ही अंकशास्त्राची एक पद्धत आहे. जन्मतारखेच्या सर्व अंकांची बेरीज हा त्या व्यक्तीचा मूलांक मानला जातो. तर आज आपण ज्या मुलींचे लग्न उशिरा होतात त्यांच्या मूलांकाबद्दल जाणून घेऊयात.
मूळ क्रमांक 8 असलेल्या मुली
म्हणजे जन्मतारखेच्या सर्व अंकांची बेरीज 8 येते त्यांचं मूलांक 8 असते. मूल्यांक 8 अंतर्गत येणाऱ्या जन्मतारखा 8, 17 आणि 26 या आहेत. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे मूलांक 8 असते. या मूलांकच्या मुली न्यायक्षेत्रात यशस्वी होतात. त्यांचे प्रेमसंबंध फारसे स्थिर नसतात. अनेकदा त्यांचे जोडीदारासोबत वाद होतात. त्यांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी टिकत नाहीत. हेच कारण आहे की मूलांक 8 असलेल्या मुली उशीरा लग्न करतात. त्यांच्या लग्नाला उशीर होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)